banks closed for 24 days in 2024 bank holidays sheet issued nagpur Sakal
नागपूर

Bank Holiday : २०२४ मध्ये २४ दिवस बँका बंद!कोणत्या दिवशी असेल सुट्टी घ्या जाणून..

दोन सुट्यांना मुकणार कर्मचारी : सार्वजनिक सुट्ट्यांचे पत्रक केले जारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नववर्षात म्हणजेच २०२४ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने काढले आहे. या दिवशी बँकांचे ऑनलाइन व्यवहार मात्र सुरू असणार आहेत.

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या अखत्यारीतील बँकेच्या सुट्ट्यांची यादी १८८१ च्या कायद्यांतर्गत जाहीर करतात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भारतात बँक व सरकारी कार्यालयांना सुट्टी असते.

पण या व्यतिरिक्त राज्यातील सर्व बँक व सरकारी कार्यालये राष्ट्रीय उत्सव व सणाच्या निमित्तानेही बंद असतात.

२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या तीन राष्ट्रीय सुट्ट्या आहेत. यासह विविध सणांच्या निमित्ताने २०२४ मध्ये बँका बंद असतील. यात स्वातंत्र दिवस आणि पारशी नूतनवर्ष एकाच दिवशी आले आहे. दुसरा शनिवार आला असल्याने दोन सुट्यांना बॅंक कर्मचाऱ्यांना मुकावे लागणार आहे.

महिन्यानुसार असलेल्या सुट्ट्या

जानेवारी : २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)

फेब्रुवारी : १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

मार्च : ८ मार्च - महाशिवरात्री, २५ मार्च - होळी, २९ मार्च - गुड फ्रायडे

एप्रिल : १ एप्रिल - वार्षिक लेखाबंदी, ९ एप्रिल- गुढीपाडवा, ११ एप्रिल - रमजान ईद, १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (रविवार), १७ एप्रिल- रामनवमी, २१ एप्रिल - महावीर जयंती

मे : १ मे- महाराष्ट्र दिन, २३ मे- बुद्ध पौर्णिमा

जून : १७ जून - बकरी ईद

जुलै : १७ जुलै - मोहरम

ऑगस्ट : १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन व पारशी नववर्ष

सप्टेंबर : ७ सप्टेंबर - गणेश चतुर्थी, १६ सप्टेंबर - ईद ए मिलाद

ऑक्टोबर : २ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती, १२ ऑक्टोबर - दसरा,

नोव्हेंबर : १ नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबर- दिवाळी पाडवा, १५ नोव्हेंबर - गुरुनानक जयंती

डिसेंबर : २५ डिसेंबर- नाताळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT