file 
नागपूर

सावधान! नागपूर जिल्ह्यतील गावे पार हादरली, कारण आहे हे...

दिलीप गजभिये/अजय धर्मपुरीवार

हिंगणा/ खापरखेडा (जि.नागपूर) : नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. १३ तालुक्यात आता कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दहा हजाराचा टप्पा लवकरच पार करण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे २२६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सद्यस्थितीत ४२९६ कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाचा धसका घेतला आहे.

रुग्णालयात जाण्यापूर्वीच रुग्णांचा जीव धोक्यात
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. कामठी व हिंगणा तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. नागपूर ग्रामीण भागात कुही, भिवापूर, पारशिवनी, (कांदरी)कामठी, काटोल, पारडसिंगा, कळमेश्वर, (वानाडोंगरी) हिंगणा, सावनेर ,मौदा, रामटेक, उमरेड, नरखेड याठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दररोज या ठिकाणी शेकडो कोरोना रुग्णांची तपासणी केली जात आहे. कोरोनावर ग्रामीण भागातील ६८५० रुग्णांनी मात करून बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये ९१,४९४ कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. या रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडची कमतरता आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांना भरती करण्यासाठी रुग्णालयात जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्ण भरती करण्यासंदर्भात एक धोरण तयार करणे गरजेचे आहे. या पोर्टलवर ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती सुद्धा असणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याने रुग्णालयात जाण्यापूर्वीच रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तरच ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेणार का, हे येणारा काळच सांगेल.

 प्रशासनाने कोरोनाविरुद्ध जोरदार लढा
खापरखेडा: खापरखेडा परिसर वीज केंद्र, वेकोलिसारख्या औद्योगिक कारखान्यांनी नावारूपास  आला असून लाखोंच्यावर लोकसंख्येने परिसर चांगलाच गजबजलेला आहे. येथे स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे जिल्हा परिषदेचे चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसरातील वेकोलीचे रुग्णालय, वीज केंद्राचे रुग्णालय शिवाय खासगी दवाखाने तर भरमसाठच आहे. चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील चिंचोली, खापरखेडा, भानेगाव,  बिना (संगम), सुरदेवी, पोटा, वलनी, सिल्लेवाडा आदि आरोग्य उपकेंद्रे आहेत. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाच्या प्रकोपाने पाय पसरविले असून दिवसेंदिवस बाधित रुग्ण वाढू लागले. ज्यामुळे परिसरात वाढत्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने अख्खे आजूबाजूची गावे हबकली.

‘अनलॉक’नंतर जोपासलेली शिस्त ढेपाळली
कोरोना बाधितांची संख्याही वाढतीवर सुरू झाली. आता तरी नागरिकांनी सतर्क होण्याचे स्थानिक प्रशासनातील अधिकार विनंतीपूर्वक आवाहन करीत असतातच. मोठ्या प्रमाणात स्फोट होण्याअगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत दक्ष होण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. परिसरातील संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाविरुद्ध जोरदार लढा दिला, परंतू काही शिस्तभंग करणारे , नियम न पाळणारे, कोरोनाला गंभीरतेने न घेणा-या लोकांनी ‘अनलॉक’नंतर जोपासलेली शिस्त ढेपाळली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित संख्येचे आकडे वाढतीवर झाले. एकीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकंदरीत २७१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर कोरोनाच्या संक्रमणाने ७ जणांचे मृत्यूही झाले. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्या संशयीतांची तपासणी करण्यात येते. त्यामुळे एक दोन दिवसाआड कोरोना-१९ चाचणी परीक्षणाचा कॅम्प आरोग्य केंद्र प्रशासनाकडून चिंचोली प्राथमिक शाळेमध्ये सुरूच आहे. आजवर या कोव्हिड-१९ कॅम्पमध्ये एकूण २०९५ जणांची तपासणी करण्यात आली असून तपासणीत अडीचशेच्यावर बाधित रुग्ण आढळून आल्याचे अनुमान व्यक्त केला जात आहे. यातीलच काही रुग्णांची बाहेरुन खासगीत तपासणी केली असल्याचे अनुमान आहे.

हेही वाचाः कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका…

घरीच उपचार करण्याचे प्रकार वाढले
 या एकंदरीत असलेल्या बाधितांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील ६ कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आले, शिवाय विज केन्द्रातील अधिकारी,कर्मचारी, कंत्राटी कामगार तसेच कोळसा खानीतील सुद्धा काही कर्मचारी बाधित आढळून आले. एवढेच नाही तर खापरखेडा पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आले.ताप, सर्दी, खोकला व अन्य प्रकारच्या लक्षणांचा विकार अंगावर काढण्याची प्रवृत्ती बळावली आहे. आता अधिकांश नार्मल रुग्ण असला की रुग्णालयातून गोळ्या घेवून घरीच उपचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. दिवसेंदिवस रुग्ण बाधित संख्या झपाट्याने वाढत असल्याने मेडिकल, मेयो, एम्समध्ये बेड शिल्लक राहत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे होमक्वारंटाईन विलगीकरण करुन स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून  उपचार करुन घेतला जात आहे.

सहकार्य करण्याची गरज
दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत जरी असली तरी अख्खी आमची आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करुन यश मिळणारच आहे. यासाठी जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची गरज आहे. आमचे कर्मचारी काही ठिकाणी बाधित होत असल्याने त्यांचा क्षेत्रात थोडीफार अडचण येवू शकते. तरीपण दुसऱ्या कर्मचा-यांना कामाला लावून अडचण दूर करीत आहोत. वेळोवेळी औषधोपचारासह आरोग्य सेवा पुरविली जात आहे.
डॉ.प्रशांत वाघ
तालुका आरोग्य अधिकारी

संपादनः विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

Raj Thackeray: मुंबईत मनसे फॅक्टर ठरणार निर्णायक; बदललेली भूमिका वाढवतेय महायुतीची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT