भास्कर जाधव व नीतेश राणे यांच्यात कलगीतुरा sakal
नागपूर

Nagpur : भास्कर जाधव व नीतेश राणे यांच्यात कलगीतुरा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते आज नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार नीतेश राणे शहरात आल्यानंतर आमनेसामने आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि नीतेश राणे यांच्यात वाग्युद्ध रंगले.

जाधव यांनी राणे यांना सिंधदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील घटनेची आठवण करून देत जोश काय असतो, हे शिवसैनिकांनी दाखवून दिल्याचे सांगितले. तर प्रत्युत्तरादाखल नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची वाट अडवण्याचा जो प्रकार घडला होता, त्याचा हिशेब नागपुरात चुकता झाला का? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

भास्कर जाधव म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्यावेळी आदित्य ठाकरे गेले होते. त्या वेळी आपल्या सरकारमुळे पुतळा पडला, याची लाज बाळगण्याऐवजी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा रस्ता रोखून धरला होता. आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा, असे सांगण्यात आले. मात्र ठाकरे यांनी रस्ता बदलला नाही. आज आमचा जोश काय असतो, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले.

नीतेश राणे प्रत्युत्तरादाखल म्हणाले, की धर्मवीर आनंद दिघे यांचा खून झाल्याचा संशय वर्षानुवर्षांचा आहे. खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मारुन टाकण्याच्या सुपाऱ्या दिल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून झाला. एकनाथ शिंदे मविआत मंत्री असताना त्यांची सुरक्षा कमी केली होती.

विमानतळावर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपचे नेते, आमदार नीतेश राणे रविवारी नागपुरात आले. दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने विमानतळ परिसर दणाणून गेला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत राणे यांची रवानगी दुसऱ्या द्वारातून केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Murder : बारामती हादरली! १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून

Viral video Swiggy CEO: स्विगीच्या सीईओंचे वक्तव्य चर्चेत! जास्त वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय म्हणाले?

IRE vs SA T20I : एका भावाचे शतक, तर एकाने घेतल्या ४ विकेट्स; आयर्लंडने इतिहासात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला नमवले

Latest Maharashtra News Updates : आदिवासी आमदारांची समजूत काढण्यासाठी मंत्री विजयकुमार गावितांचे प्रयत्न सुरू

Chakan MIDC: चाकणमधील तब्बल 50 कंपन्या राज्याबाहेर? उद्योग संघटनेकडून दुजोरा; सुप्रिया सुळेंकडून सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT