हिंगणा (जि. नागपूर) : अंगात नागोबा संचारल्यानंतर मंत्रोपचाराने कोरोना (coronavirus) बरा करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाला एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अंनिसच्या मदतीने शनिवारी (ता. १५) सकाळी अटक केली. शुभम तायडे (वय ४२) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंचशीलनगरमध्ये दरबार चालवत होता. अंनिसच्या कार्यकर्त्यांना या बाबाच्या भोंदूगिरीचा प्रकार कळल्यानंतर पोलिसांत तक्रार केली होती. (Bhondu Baba arrested for claiming to cure Coronavirus)
नागासारखा फूत्कार करणारा व डोलणारा भोंदू बाबा शुभम तायडे हा अंगात नाग संचारला की, कोरोना बरा होतो, असा दावा करायचा. त्यासाठी तो मंत्रतंत्राचा वापर करायचा. नागोबा बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भोंदू बाबाचा दर गुरुवारी नागपूरच्या पंचशीलनगरमध्ये दरबार भरायचा. त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्णदेखील यायचे. मात्र, त्याने एका महिलेची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आला. त्यांनतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबाला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदू बाबा कोरोनाच्या उपचाराव्यतिरिक्त पैशांचा पाऊस पाडणे, कौटुंबिक कलह दूर करणे, गुप्तधन शोधून देणे या नावावरदेखील सामन्यांची फसवणूक करत होता. पलंबरचे काम करणारा हा भोंदू बाबा दोन वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर भक्तांनी त्याला सोडण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली, अशी माहिती ठाणेदार युवराज हांडे यांनी दिली. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे.
हे सुधारायला हवे
रुग्ण विज्ञानाकडे वळण्यापेक्षा नागोबा बाबासारख्या भोंदूच्या जाळ्यात अडकतात व स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकतात. हे सुधारायला हवे, असे आवाहन अंनिस सदस्य हरीश देशमुख यांनी केले.
(Bhondu Baba arrested for claiming to cure Coronavirus)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.