नागपूर : विधान परिषदेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा मतांच्या फरकाने जिंकली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या २२ मतदारांनी विरोधात मतदान केले असल्याचे उघड झाले आहे. त्या घरभेद्यांचा भाजपतर्फे शोध घेतल्या जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी चोख बंदोबस्त केला होता. आपल्या मतदारांना सुमारे आठ ते दहा दिवस सहलीला नेऊन त्यांना इतरांच्या संपर्काबाहेर ठेवले होते. मतदानाच्या दिवशी सकाळी थेट बसने त्यांनी मतदान केंद्रावर आणले. एकूण ३३४ मतदार भाजपच्या खेम्यात होते. एकूण ५५९ मतदारांपैकी निम्मांपेक्षा अधिक मतदान सोबत असल्याने भाजप तशी निश्चिंत होती. मात्र अनेक निवडणुकांची अनुभव असलेले बावनकुळे शांत बसले नाही. घरभेद्यांचा अंदाजही त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांशी संपर्क केला. मतदान करण्याची विनंती केली. उमेदवार या नात्याने भेटीगाठी घेतल्या. त्याचा सकारात्मक निकालही दिसून आला.
त्यांना ३६२ मते मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ तर रवींद्र भोयर यांना एक मत मिळाले. पाच मते अवैध ठरली. तब्बल १७६ मतांची आघाडी घेऊन त्यांनी निवडणूक जिंकली. अतिरिक्त मतांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच अपक्ष मते त्यांनी आपल्याकडे वळविल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपचा फुटलेल्या मतांची फारशी चर्चा झाली नाही. मूठ झाकली राहिली. पक्षातर्फे बारकाईने आकडेमोड केली असता भाजपची २२ मते फुटल्याचे निदर्शनास आले आहे. ते नेमके कोण याचा शोध घेतल्या जात आहे. यात काही शहरातील नगरसेवकांचाही समावेश असल्याचे कळते. पान ५ वर
मात्र, सर्वाधिक फुटलेली मते ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी असलेल्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य आहेत. ही बाब निवडणुकीपूर्वीच समोर आली होती. भाजपने याचे भांडवल करण्याचाही प्रयत्न केला होता. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी देशमुख आमचेच उमेदवार असल्याचाही दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता.
लक्ष्मी’दर्शन करणारे येणार अडचणीत विरोधकांना मतदान करण्याऱ्यांचा शोध सुरू
नागपूर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस व्होटिंग’ झाली. याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली असून ‘लक्ष्मी’ दर्शन करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात येते.
विधान परिषदेकरता नुकतीच निवडणूक पार पडली. यात कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार मंगश देशमुख यांना समर्थन जाहीर केले होते. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनुकळे विजयी झाले. निवडणुकीत अनेकांना ‘लक्ष्मी दर्शन’ झाले. महाविकास आघाडीत फुट पडल्याचे दिसून आले. कॉंग्रेस आणि भाजपला अपेक्षपेक्षा कमी मते मिळाली असून विरोधकांची मते मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.
महाविकास आघाडीची ६० मते फुटली असून त्यात कॉंग्रेसच्या १५ ते २० मतांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भाजपचीही २० ते ३० मते फुटल्याची चर्चा आहे. आता पक्षाकडून त्यांचा शोध घेतला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काहींचा शोध पक्षाला लागला आहे. येत्या काही दिवसात सर्व फुटणाऱ्यांचा शोध लावण्यात येणार असून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई सुद्धा करण्यात होणार असल्याचे सांगण्यात येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.