Image  
नागपूर

मिहानमधील भारत बायोटेकला पुण्याला पळविले; आता काँग्रेसचे नेते गप्प का?: आमदार खोपडे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: नागपुरातील मिहान (MIHAN Nagpur) परिसरात भारत बायोटेक (Bharat Biotech) व सिरम इन्स्टिट्यूट(Serum Institute) यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ते पुण्याला पळवल्याचा आरोप आमदार कृष्‍णा खोपडे(Krushna Khopde) यांनी केला आहे. यावर पालकमंत्री नितीन राऊत(NItin Raut) यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले असाही सवाल त्यांनी केला आहे. (BJP MLA Krishna Khopde criticized Congress over bharat biotech)

भारत बायोटकची इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच प्रेझेंटेशन करण्याचे निर्देशही झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिहानच्या या प्रोजेक्ट बाबत माहिती होती. असे असताना विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी एक शब्दही काढला नाही.

नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेले विदर्भातील नेत्यांनी किमान आलेल्या प्रकल्प थांबवण्याचीसुद्धा हिंमत दाखवली नाही याबाबत खोपडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. मात्र त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असल्याचे आमदार खोपडे म्हणाले.

नागपूर शहरात कोरोनाचे थैमान असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्हयात रेमडेसिव्हिरचा उत्पादन सुरू केले. कोविडमुळे फंगस इन्फेक्शन वाढत असून याचेही उत्पादन करण्याची मंजुरी त्यांनी मिळवून दिली. कामे कशी करावीत, प्रोजेक्ट कसे आणावे याची शिकवण काँग्रेसच्या नेत्यांनी गडकरींकडून घ्यावी, असा सल्लाही खोपडे यांनी दिला.

(BJP MLA Krishna Khopde criticized Congress over bharat biotech)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT