नागपूर : जिल्हा परिषद (nagpur zp election) व पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या निवडणुकींसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी (congress ncp alliance) निश्चित झाली आहे. विद्यमान जागांवर आपआपले उमेदवार देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. तर भाजपकडे असलेल्या जागांवर रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता. सदस्यत्व रद्द झालेल्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तरी बंडखोरीच्या भीतीने उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यांना थेट आज ‘बी’ फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. (BJP still not announce candidate name for nagpur zp election)
जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोट निवडणुका होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २४ तासांचा वेळ शिल्लक असताना अद्याप उमेदवार निश्चित झाले नाहीत. आज दिवसभर सर्वच पक्षांच्या बैठकींचे सत्र सुरू होते. दुपारला दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे तर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सलिल देशमुख, बंडू उमरकर उपस्थित होते. यात आघाडी कायम ठेवत त्यांच्याकडे असलेल्या जागा कायम ठेवण्याचा निर्णय झाला. निवडणूक होत असलेल्या जागांपैकी ४ भाजपकडे आहेत. यात तीन जागांवर कॉंग्रेस तर एका जागेवर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. यातील २-२ जागांवर लढण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला होता. परंतु, तो कॉंग्रेसने अमान्य केला. त्यामुळे या जागांचा तिढा कायम असून प्रसंगी येथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी शनिवार मंत्री सुनील केदार व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. काही जागांवर एकमत नसल्याने काहींकडून आघाडीवर शंका उपस्थित करण्यात आली. परंतु, एकाही पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. दोन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका असल्याने सोमवारलाच थेट ‘बी’ फॉर्म उमेदवाराला मिळणार असल्याचे सूत्रांकडून शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सेनेसोबतची चर्चा निष्फळ -
कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. परंतु, यात कोणताही तोडगा निघाला नाही. विद्यमान जागेपैकी एकही सेनेकडे नसल्याने जागा सोडण्यास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना सर्व जागा लढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाजपची नावे अंतिम -
भाजप नेत्यांचीही आज बैठक झाली. यात उमेदवांच्या नावावर चर्चा झाली. भाजपकडूनही विद्यमान सदस्यांनाच संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु, काही जागांवर अंतिम निर्णय झाला नाही. भाजपलाही बंडखोरी होण्याचा धोका आहे. शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील नाराजांवरही त्यांची नजर असल्याचे सांगण्यात येते.
सर्कलनिहाय सदस्यत्व रद्द झालेले सदस्य -
नाव सर्कल पक्ष
अनिल निधान गुमथळा भाजप
राजेंद्र हरडे निलडोह भाजप
अर्चना गिरी इसासनी भाजप
भोजराज ठवकर राजोला भाजप
सुचिता ठाकरे डिगडोह राकॉं
पूनम जोध भिष्णूर राकॉं
देवका बोडखे सावरगाव राकॉं
चंद्रशेखर कोल्हे पारडशिंगा राकॉं
समीर उमप येनवा शेकाप
मनोहर कुंभारे केळवद कॉंग्रेस
ज्योती शिरसकर वाकोडी कॉंग्रेस
अर्चना भोयर करंभाड कॉंग्रेस
कैलास राऊत बोथीया पालोरा कॉंग्रेस
योगेश देशमुख अरोली कॉंग्रेस
ज्योती राऊत गोधनी रेल्वे कॉंग्रेस
अवंतिका लेकुरवाळे वडोदा कॉंग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.