नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यानंतर दावे आणि प्रतिदाव्यांना सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यात १२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि सर्व पक्षांचे दावे विचारात घेतले तर एकूण ग्रामपंचायती १७० पेक्षाही जास्त. या सर्व भानगडीत राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला हे अधोरेखित होतेय. त्यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने पसंती दिल्याचे काल लागलेल्या निकालांवरून दिसून येते.
बावनकुळे राहत असलेल्या कोराडी ग्रामपंचायतीवर भाजप समर्थीत पॅनलने दणदणीत विजय मिळविला. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीवर १२ सदस्य भाजपचे निवडून आले, तर ५ जागांवर महाविकास आघाडी समर्थीत पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यांच्या कामठी मौदा विधानसभा मतदारसंघात ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये ६ ग्रामपंचायतीवर भाजपचे पॅनल विजयी झाले आहे. सारासार विचार केला असता भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येऊन लढले. तीनच्या विरोधात एकटी भाजप, असे गणित जुळवले तर भाजपची कामगिरी सरस ठरली, असे बोलले जात आहे.
कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघातील ९ पैकी ६ ग्रामपंचायतींमध्ये आमचाच गुलाल असणार आहे, असे भाजपतर्फे सांगितले जात असले तरी. या ६ पैकी आणखी एक ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांच्या कापसी-महालगाव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे भाकीत जाणकारांकडून वर्तविले जात आहे. अर्थात सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निश्चित काहीही सांगता येणे अवघड आहे. ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे आरक्षण काय असेल, याचेही अंदाज बांधणे सुरू झाले आहे. काहींच्या मते मागच्या वेळी असलेलेच आरक्षण यावेळी कायम असणार आहे. असे झाले तर कापसी-महालगाव भाजपच्या हातून जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
काँग्रेसकडील घोरपड-शिरपूर भाजपने खेचली -
येरखेडा-भिलगाव या जिल्हा परिषद गटातील घोरपड-शिरपूर ही ग्रामपंचायत पूर्वी कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पण यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंच्या कुशल रणनीतीने भाजपने ती खेचून आणली आहे. येथे कॉंग्रेसचे सदस्यच भाजपने आपल्या पॅनलमध्ये खेचले, त्यामुळे निवडणूक सुलभ झाली. भिलगावचे मोहन माकडे येथील जिल्हा परिषद सदस्य आहेत. मोहन माकडे आणि पंचायत समिती सभापती उमेश रडके यांच्या संयुक्त प्रयत्नातून घोरपड-शिरपूर आपल्याकडे खेचण्यात भाजपला यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.