Yogendra Yadav  sakal
नागपूर

Yogendra Yadav : घटना बदलण्याचे काम सुरू, पण छुप्या पद्धतीने; जातीयवादाचे विष लवकर कमी होणार नाही!

Yogendra Yadav : लोकसभा निवडणुकीनंतर बहुमतात न आलेल्या भाजपकडून आताही घटना बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, लोकांसमोर ते येऊ देत नाही.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: ‘‘राज्यघटना बदलण्याची भाषा करणारे लोकसभा निवडणुकीनंतर नरमले. भाजप आणि संघाचा कार्यक्रम हा राज्यघटना बदलण्याचा आहे. २०१४ नंतर ते जाहीरपणे बोलत होते. आता त्यांची भाषा बदलली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बहुमतात न आलेल्या भाजपकडून आताही घटना बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, लोकांसमोर ते येऊ देत नाही.

त्यांचे काम छुप्या पद्धतीने सुरू आहे,’’ असे मत ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक व ‘भारत जोडो यात्रे’चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

‘सकाळ’च्या नागपूर कार्यालयाला यादव यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. ‘भारत जोडो यात्रे’चे महाराष्ट्र संयोजक प्रा. संजय मंगो आदी उपस्थित होते.

यादव म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचा स्वीकार केला नाही. तेव्हापासूनच हा प्रयत्न सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात राज्यघटनेची समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.’’ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सरकार बहुमतात न आल्याने भाजप व संघाचे समर्थक सावध झाले. लोकांसमोर घटनेची शपथ घ्यायलाही ते आता तयार आहेत. राज्यघटनेची शपथ घेऊन ते घटना संपवित आहेत. घटना संपवायची मात्र, लोकांपुढे ते येऊ द्यायचे नाही असा प्रयत्न भाजप सरकार व ‘आरएसएस’कडून सुरू आहे. असा आरोप यादव यांनी केला.

भाजप हा तोडफोड करणारा पक्ष आहे. जिथे जाते तिथे तोडफोड करतो. जातीच्या आधारावर लोकांना विभागण्याचे काम करीत आहे. हरियानात जाट विरुद्ध दलित असा संघर्ष निर्माण केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्येसुद्धा असाच प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होतो. हरियानाच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा घेता आली नाही, असे मत यादव यांनी व्यक्त केले.

द्रविड आंदोलन हे राज्यघटनेच्य रक्षणासाठीच होते. मात्र, ‘द्रविड’ शब्दावरून भाजपचा त्यावरही हल्ला सुरू झाला आहे. त्यामुळे भाजपला आता सामन्यात ‘एलबीडब्ल्यू’ नाही तर ‘क्लीन बोल्ड’ करण्याची वेळ आली आहे.

- योगेंद्र यादव, संस्थापक स्वराज इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT