Bollywood playback singer from nagpur Aboli Girhe playback for serials movies commercials entetainment  sakal
नागपूर

Nagpur : अबोलीच्या सुरेल गायनाची पडतेय भुरळ! नागपूरचा आवाज आता बॉलीवूड गाजवणार

मालिका, चित्रपट, जाहिरातींसाठी अबोलीचे पार्श्वगायन; रसिकांवर मोहिनी

केतन पळसकर

नागपूर : कलावंताला स्क्रीनवर अभिनय, नृत्य, गायन करताना बघतो तेव्हा आपसूकच शरीरात ऊर्जा निर्माण होते. अशात तो कलावंत आपल्या विदर्भातील, आपल्या संत्रानगरीतील किंवा आपल्याच सोसायटीमधील आहे, हे कळले तर नक्कीच कुतूहल निर्माण होईल.

मराठी मालिका काहे दिया परदेस, फुलपाखरू यातील गाणे ऐकल्यानंतर हाच अनुभव आपल्याला आला असेल. कारण, नागपूरकर गायिका अबोली गिऱ्हेचा या गाण्यांना आवाज लाभला आहे.

अबोलीच्या वडिलांचा पूर्वी चित्रपटांचे वितरण करण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे, घरात कलेसाठी पोषक असे वातावरण होतेच. केवळ सात वर्षांची असताना अबोलीच्या रुपाने नागपूरने दिली पार्श्वगायिका आवाजातील सूर ओळखला. नऊ वर्षांची असताना वडिलांनी तिला संगीताचे शिक्षण देणे सुरू केले. गाण्यांची तयारी झाल्यानंतर अबोलीने सांगितिक स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले.

पहिल्याच स्पर्धेमध्ये तिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना तिने सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेणे सुरू केले. याच काळात संगीत क्षेत्राला करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तिला मिळाला.

२०१४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच तिने मुंबई गाठले आणि सांगितिक शिक्षणासह तिचा व्यावसायिक संगीत प्रवास देखील सुरू झाला.

प्रथम ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या टायटल सॉंगसाठी तिला गायन करण्याची संधी मिळाली. पुढे फुलपाखरू मालिकेच्या गाण्याने तिला अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली. काही दिवसांमध्येच वीस लाख प्रेक्षकांनी ते ऐकले. रिॲलिटी शो ‘युवा सिंगर एक नंबर’मध्ये देखील ती झळकली. तीन जाहिरातींसह मराठी चित्रपट ‘पांडू’, ‘मसुटा’ मध्येसुद्धा अबोलीच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अचंबित केले आहे.

लवकरच मराठी मालिका आणि चित्रपटांमधील गाण्यांना तिचा आवाज ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. कमी वयात अबोलीने घेतलेली मोठी झेप बघता नागपूरने इंडस्ट्रीला एक उत्कृष्ट पार्श्वगायिका दिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रसिद्ध बँड्समध्ये अबोलीचा वावर

स्पर्धेच्या या युगामध्ये केवळ गळा सुरेल असून चालत नाही; तर, गायकांना सादरीकरणावर देखील तितकाच भर द्यावा लागतो. हे कसब देखील अबोली लिलया पार पाडते. याच जोरावर सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, राहुल रानडे व गुरू ठाकूर, अशोक हांडे आणि एका प्रसिद्ध वाहिनीच्या बँडमध्ये ती सक्रिय आहे. अबोलीने आजवर पाचशेवर लाइव्ह शोमध्ये सादरीकरण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT