Boy from Kamptee is no more by drowning in sea  
नागपूर

अचानक आला एकुलत्या एक मुलाच्या निधनाचा फोन; कुटुंबासह गावात पसरली शोककळा   

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) :  घरातला एकुलता एक मुलगा वडिलांचे आधीच छत्र हरपले. स्वतःच्या हिमतीवर सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आणि दोन वर्षापूर्वी नोकरीसाठी पुणे गाठले. एक दिवस खूप मोठे होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण काळाने पाण्याच्या प्रवाहाबरोबर सगळेच वाहून नेले. ही घटना आहे कामठी  तालुक्यातील परसाड या गावातील मनोज मधुकर गावंडे या २४ वर्षीय तरुणाची, औंध पुणे येथून कंपनीतील सहकारी कर्मचाऱ्यांसह आंजर्ले येथे पर्यटनासाठी गेले असता समुद्रात तिघांचा बुडून मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला शिकविण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या आईचे भान हरपले तिला धक्काच बसला तर गावातही मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. 

कामठी तालुक्यातील परसाड येथील मनोज मधुकर गावंडे हा तरुण पुण्याच्या औंध येथील कॉन्सस्ट्रिक्स या कंपनीत नोकरीला होता. कंपनीतील १५ कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हलरणे गुरुवारी रत्नागिरी येथील आंजर्ले येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यातील सहा जण समुद्रात पोहायला गेले. पोहताना त्यांना पाण्यातील करंटचा अंदाज आला नाही. ते समुद्रात ओढले गेले व बुडू लागले.

किनाऱ्यावर असलेल्या १२ वर्षीय संचित सावंत या मुलाला पर्यटक बुडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने लगेच धावत जाऊन परिसरातील काही तरुणांना याबाबत माहिती दिली. यातील काही तरुणांनी समुद्रकिनारी बचाव साहित्यासह धाव घेतली, तर काहींनी आंजर्ले खाडीकडे धाव घेत स्पीड बोट घेऊन समुंद्र गाठला. काही तरुणांनी रिंग बोया व दोरीच्या साहाय्याने समुद्रातील पाण्यात जाऊन या सहा जणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. थोड्यावेळाने सहाही जणांना किनाऱ्यावर आणले. 

त्यांची तपासणी केली असता मनोज गावंडे सह त्यांचे मित्र अक्षय राखेलकर, विकास श्रीवास्तव या तिघांचा मृत्यू झाला होता. उर्वरित तिघांना उपचारासाठी आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मनोज कंपनीच्या मित्रांसोबत आंजर्ले येथे जाणार असल्याची त्याने आपल्या आई ला दिली होती. परंतु मनोजच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी ३.३० वाजता त्यांच्या कुटुंबीयांना कळली आणि त्यांना धक्काच बसला. रत्नागिरी दूर असल्याने त्याचे कुटुंबीय तेथे पोहोचू शकत नाहीत. आज शनिवारी दुपारी १२ वाजता मनोजचा मृतदेह शव विच्छेदन करून रत्नागिरी येथील दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातून नागपूरकडे रवाना झाले असून रात्री उशिरापर्यंत कामठी तालुक्यातील परसाड येथे त्याच्या गावी पोहोचल्यानंतर अंत्यविधी उरकण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण

मनोजकडे शेती नाही. सहा वर्षापूर्वी वडिलाचे छत्र हरपले. त्याने संपूर्ण शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण तालुक्यातील परसाड येथील विवेकानंद विद्यालयात घेतले तर इंजिनिअरिंग एस. बी जैन कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या औंध येथील कॉन्सस्ट्रिक्स या आयटी कंपनीत नोकरी करीत होता. त्याची आई  परसाड येथे छोट्याश्या खोलीत रहात असून, तिचे बँकेत खाते नसल्याने तो दर महिन्याला आई साठी मित्राच्या खात्यात पैसे जमा करायचा आणि मित्र ते पैसे न चुकता आई ला द्यायचा. 

एकामागोमाग एक सारे समुद्रात ओढले गेले

 शुक्रवारी सकाळी नाश्ता झाल्यानंतर सर्व समुद्रकिनारी आले. समुद्रात पहिल्यांदा कमरेपर्यंत पाण्यात दोघेजण पोहत होते. पोहता पोहता ते समुद्रात ओढले गेले. यांना वाचवायला दोन जण गेले, तेही पाण्यात ओढले गेले. या चार जणांना वाचवायला आणखी दोघेजण गेले. तेही समुद्रात ओढले गेले. दुपारी बारा वाजता चे  सुमारास ही घटना घडली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT