नागपूर : जन्मताच पहिल्या काही मिनिटांतच नवजात शिशूंचे मृत्यू होतात. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी उपराजधानीतील ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सतिश देवपुजारी यांच्यासह वैद्यकीय चमूने संशोधनातून नवजात बालकांचे प्राणवायू दाब नियंत्रण यंत्र विकसित केले असून जन्मतः बाळ रडले नाही, तर हे यंत्र वरदान ठरणार आहे, असा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.
बाळाचा जन्म झाल्यावर तीन मिनटांच्या आत बाळ रडायले हवे. रडण्यातून त्याला प्राणवायूचा मिळतो. तोही हवेत असलेल्या ऑक्सिजनमधून होत असल्याचे संकेत मिळतात. तीन मिनटांत प्राणवायू न मिळाल्यास त्याच्या मेंदूलाही इजा होऊ शकते, असे सांगत डॉ. सतिश देवपुजारी म्हणाले, बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार प्रत्येक १०० जन्मणाऱ्या बाळांपैकी चार ते पाच बालकांना जन्मजात श्वास घ्यायला त्रास होतो.
त्यामुळे त्यांना योग्य नियंत्रणातून प्राणवायू देणे आवश्यक आहे, या गरजेहून जास्त प्राणवायू दिल्यास बालकाला ‘अंधत्व’ येण्याची जोखीम असते. अशावळी प्राणवायूचा दाब नियंत्रित करण्यासाठी हे यंत्र वरदान ठरते.
देशी साहित्यातून यंत्र विकसित
विदेशात सध्या या पद्धतीचे यंत्र फार महागडे आहे. त्यामुळे नागपुरात संपूर्ण देशी साहित्यातून हे नवजात बालकांसाठी हे यंत्र विकसित केले आहे. त्याचे स्वामित्व (पेटेंट) हक्कासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. लवकरच ते मिळेल, असा विश्वास डॉ. देवपुजारी यांनी व्यक्त केला. हे यंत्र महाराष्ट्रासह भारतात बालमृत्यू कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते. नेल्सन रुग्णालयात १२ मे रोजी आयोजित वैद्यकीय परिषदेत या यंत्राचा नमुना सादर करणार असल्याचेही डॉ. देवपुजारी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. यश बनाईत, डॉ. राशी गुप्ता, डॉ. सुचिता खडसे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.