नागपूर

Budget 2024: नागपूर-सेवाग्राम तिसऱ्या रेल्वे लाईनला ८७ कोटी! वर्धा -नागपूर चौथ्या लाइनसह इतर प्रकल्पांना गती मिळणार

नागपूर- सेवाग्राम या ७६ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Sevagram Railway Line Funds Budget 2024: नागपूर- सेवाग्राम या ७६ किलोमीटरच्या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या तिसऱ्या नव्या मार्गामुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार असून वेळेची बचत होईल. काही वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू आहे. अद्याप पूर्ण झाले नाही. येत्या दोन वर्षांत या मार्गाचे काम होईल, अशी अपेक्षा आहे. पुढील दोन वर्षांत तिसरा रेल्वे मार्ग तयार होईल. त्यानंतर वाहतुकीची गती वाढून वेळेची बचत होणार आहे.

त्यादृष्टीने अर्थसंकल्पातील तरतूद महत्त्वाची आहे. नागपूर-सेवाग्राम ही तिसरी लाईन ७६ किलोमीटरची आहे. त्याचबरोबर नागपूर-इटारसी ही तिसरी लाईन २८० किलोमीटरची असून यासाठी ६१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वर्धा-बल्लारशा या १३२ तिसऱ्या लाईनकरीता ३०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. (Latest Marathi News)


वडसा-गडचिरोली या ५० किमीच्या नव्या मार्गासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गाड्या सुद्धा वाढविण्यात आल्या. मात्र मार्ग तेवढेच असल्याने गाड्या वाढूनही वेळेची बचत होत नाही. त्यामुळे या तिसऱ्या नव्या मार्गाची गरज निर्माण झाली. सेवाग्राम-नागपूर तिसरी लाइन ७६ किलोमीटर, इटारसी - नागपूर तिसरी लाइन २८० किलो मिटर, तर वर्धा -नागपूर चौथी लाइन ७८ किलो मीटरची राहणार आहे.

१४५ पूल, ११ स्थानके
नागपूर-सेवाग्राम या तिसऱ्या लाइनचे अंतर ७६.३० किलोमीटरचे आहे. यात ११ स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे लाईन दरम्यान १४५ पूल असून यात २ मोठे, १० मध्यम आणि १३३ लहान आहेत. (Latest Marathi News)

पाच वर्षापूर्वी या प्रकल्पाची किंमत ५४०.०२ कोटी रुपये होती. हा प्रकल्प २०१५ साली मंजूर झाला होता. २०१९-२० पर्यंत तो पूर्ण करायचा होता. मात्र, ५ वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्ण झाला नाही. आता नव्याने ८७ कोटींची तरतूद झाल्याने प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १८२ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३९.१५ कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT