Buldhana Bus Accident sakal
नागपूर

Buldhana Bus Accident : नोकरीवर रूजू होण्यासाठीचा, चौघांचा प्रवास ठरला अखेरचा

वर्ध्यातील कृष्णनगर येथील तेजस पोकळे हा मुळातच हुशार. परिस्थिती बेताची असताना त्याने परिश्रमातून दहावी आणि बारावीत गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

Buldhana Bus Accident - आपल्या हुशारीच्या जोरावर शिक्षण घेऊन पुण्यात नोकरीवर रुजू होण्याकरीता निघालेल्या वर्धेचा तेजस रामदास पोकळे, अवनी परिमल पवनीकर, जिल्ह्यातील पवनारचा सुशील दिनकर खेलकर व अल्लिपूर येथील संजीवनी शंकर गोठे या चौघांचाही हा प्रवास अखेरचा ठरला.

वर्ध्यातील कृष्णनगर येथील तेजस पोकळे हा मुळातच हुशार. परिस्थिती बेताची असताना त्याने परिश्रमातून दहावी आणि बारावीत गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण घेतले होते. यातून त्याची औरंगाबाद येथे अभियांत्रिकीकरिता निवड झाली. महाविद्यालयात झालेल्या पहिल्याच कॅम्पस मुलाखतीत त्याची निवड झाली.

त्याच कंपनीत सोमवारी तो रुजू होणार होता. त्यासाठी तो नातेवाईकांसह निघाला होता. मात्र, नव्या नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून निघालेल्या तेजसचा हा अखेरचा प्रवास ठरला. तेजसचे वडिल सुतारकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा नोकरीवर लागण्याचा आनंद साजरा करण्याच्या वडिलांच्या स्वप्नाचाही या अपघातात चुराडा झाला. आई-वडील, एक बहीण असे तेजसचे कुटुंब आहे. तो राहत असलेल्या परिसरात सर्वांकडूनच त्याच्या गुणवत्तेची प्रशंसा होत असून त्याच्या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

वर्धा शहरातील गीताई नगर परिसरातील अवनी परिमल पवनीकर (वय २५) ही मेकअप आर्टिस्ट होती. तिने नुकतेच विदेशातून एमएस केले होते. लहान बहीण संस्कृती पुणे येथे फॅशन डिझानिंगचे शिक्षण घेत आहे.

तिला सोबत म्हणून अवंतीने पुणे येथे नोकरीसाठी अर्ज केला होता. तिला नोकरी मिळाली होती. शनिवारी (ता. १ जुलै) ती जॉईनिंग करणार होती. त्यासाठी ती शुक्रवारी सायंकाळी खासगी बसने निघाली. अवनीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तिची आई सावंगी येथे कार्यरत आहे.

जिल्ह्यातील अल्लिपूर येथील संजीवनी गोठे पुण्यात एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती. त्या नोकरीवर रूजू होण्यासाठी ती निघाली होती. संजीवनीची मोठी बहीण पुण्यात जॉब करीत आहे. तिचे वडील भारतीय जीवन विमाचे एजंट आहे व सोबत शेती करतात.

पुण्याला जावून मुंबईत नोकरीवर रूजू होण्यासाठी निघालेला पवनारचा सुशील दिनकर खेलकर (वय २७) याचा नव्या नोकरीचा आनंद क्षणिक ठरला. सुशीलने याच वर्षी पुण्यातील इंदिरा कॉलेज येथून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

त्याला काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कंपनीत नोकरी लागली होती. दोन जुलैला त्याला मुंबईत कंपनीत रुजू व्हायचे होते. तो पुण्यात रहायचा. त्यामुळे तेथून सामान घेऊन तो मुंबईला निघणार होता. सुशीलचे वडील दिनकर खेलकर यांचे पवनारमध्ये किराणा दुकान असून घरी शेतीवाडी आहे. सुशीलला एक लहान बहीण आहे. मुलाच्या अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला. एकुलत्या एक सुशीलचा मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT