नागपूर : सलग दुसऱ्या वर्षी टाळेबंदीमुळे (Corona Lockdown) थंड हवेचा दिलासा देणारा कूलर-एसीचा (Cooler and AC) व्यवसाय ‘लॉक’ झाला आहे. एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन यांना भरपूर मागणी आहे. याशिवाय घरातील पंखे, फ्रीज, एसी वा कूलर नादुरुस्त झाला तरी त्यांच्या दुरुस्तीचे काम करणारे तांत्रिक कारागीर मिळणे अवघड झाले आहे. कारागीर मिळाला तरी खराब झालेले सामान मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शहरातील एसी आणि कूलरचा व्यवसाय ८० ते ८५ टक्के ठप्प झाला आहे. (Business of AC and coolers is getting low this year)
मार्चच्या शेवटी कूलरची खरेदी वा जुन्याची डागडुजी केली जाते. खसताट्या बदल, वाइंडिंग काम व अन्य दुरुस्ती कामे केली जातात. अक्षयतृतीया, गुढीपाडवा, रामनवमीसह इतरही मुहूर्तावर नवे एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदीही होते. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यात या व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे हा व्यवसाय थंड पडला आहे. मागील महिन्याभरापासून बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांची मागणी असली, तरी पुरवठा करणे विक्रेत्यांना अवघड झाले आहे. तयार असलेले कूलर कंपन्यांमध्ये, दुकानांमध्ये पडून आहेत. शहर व परिसरातून दरवर्षी सुमारे दीड लाख कूलरची तर ७० ते ८० हजार एसीची विक्री होते. कूलर उद्योगावर अडीच ते तीन हजार कुटुंबे अवलंबून आहेत.
विदर्भात सर्वाधिक कूलरची विक्री होते. अडीच ते पाच हजारांपर्यंत त्यांची किंमत असते. परंतु, लॉकडाउन जाहीर झाल्याने शहरातील बाजारपेठा बंद आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्यामध्ये कूलर व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होते. परंतु, सध्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. आता टाळेबंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस व्यावसायिकांची चिंता वाढत आहे.
उन्हाळ्याच्या काळात एसी, कूलर, फ्रीज यांना मागणी असते. १ ते २ टनी एसीची विक्री वाढते. उन्हाळ्यात उकाड्यामुळे हैराण होत असल्याने कूलरची थंड हवा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. पण यंदा कोरोनामुळे ही बाजारपेठच ठप्प झाली आहे.-नागेश बापट, संचालक, बापट शॉप
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे. दरवर्षी दीड लाख कूलर आणि ७० हजारांपेक्षा एसीची विक्री होत असते. बाजारपेठ बंद असल्याने हजारो कारागिरांचा रोजगार गेला आहे.-ए. के. गांधी, व्यवस्थापकीय संचालक, ए. के. गांधी मार्केटिंग
(Business of AC and coolers is getting low this year)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.