नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (Medical) दशकापुर्वी मंजूर झालेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट (Cancer Institute) उभारणीच्या कामाला वेग येत असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हास्पिटलशी करार करुन दोन्ही संस्थांचे एकत्रिकरणाचा घाट घातला आहे. यासाठी करार करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलची जागा मेडिकलची आहे. ३८ वर्षांपुर्वी कॅन्सर रिलिफ सोसायटीला ही जागा देण्यात आली. त्यावेळी मेडिकलमधील ३० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील, असा करार करण्यात आला होता, परंतु त्या कराराची अंमलबजावणी करण्यात आली नाही. प्रादेशिक दर्जा प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनकडून अनुदान मिळते.
मात्र राष्ट्रसंत तुकडजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल थेट मेडिकलच्या मंजूर कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्येच विलिनीकरण करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मेडिकल कॅन्सर इन्स्टिट्यूट असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. यापुर्वी मेडिकलमध्ये कॅन्सरग्रीड उभारण्यासाठी मंजूर झालेला ४५ कोटीचा निधी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वळता केला. तेथे २८ कोटीचे बांधकाम पुर्ण झाले. उर्वरित निधी त्यांच्याकडे आहे. मात्र २०१२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली.
परंतु नागपुरच्या तत्कालिन सरकारच्या लोकप्रतिनिधीनी मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगबाद येथे पळवली. मात्र, कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारणीसाठी लढा देणारे डॉ. कृष्णा कांबळे यांनी मृत्यूपुर्वीच उच्च न्यायालयात कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लढा जिंकला होता. दोन वर्षांत नागपुरात कॅन्सर संस्था उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
यामुळेच मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. ७६ कोटीचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. यामुळे या निधीतून मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावी किंवा राष्ट्रसंत तुकजोडी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट मेडिकलमध्ये विलिन करावी. कॅन्सर रिलिफ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सल्लागार ठेवण्यात यावे. तर विभागीय आयुक्त या संस्थेचे अध्यक्ष असतील.
राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलची संपुर्ण जागा मेडिकलची आहे. यामुळे या जागेवर मालकी हक्क मेडिकलचा आहे. मेडिकलमध्ये कॅन्सरविभागात मोफत उपचार होतात, यामुळे राष्ट्रसंत कॅन्सर संस्था मेडिकलमध्ये विलिन करावी.
- उत्तम शेवडे, महासचिव, बसपा, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.