Car and train mate with an accident in nagpur district  
नागपूर

ईशारा देऊनही रेल्वे रुळावरून चालवत राहिले गाडी.. अन घडली अंगाचा थरकाप उडवणारी घटना 

विजय राऊत

रामटेक (जि.नागपूर) : मॅंगनिज भरण्यासाठी रामटेक रेल्वे स्टेशनकडून कांद्री माईनकडे जाणाऱ्या मालगाडीला धडकून कारचालकासह दोन जण जखमी झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यायाकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रामटेक तालुक्यात कांद्री माईन येथे मॅंगनिज खाण आहे. हे मॅंगनिज भरून आणण्यासाठी रामटेक रेल्वे स्टेशन ते कांद्री माईनपर्यंत स्वतंत्र रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. ही व्यवस्था ब्रिटिश काळापासून आहे. रामटेक रेल्वे स्टेशनची निर्मितीच ब्रिटिशांनी मॅंगनिज नेण्यासाठी केली आहे. 

गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास रामटेक रेल्वे स्टेशनवरून कांद्री खाण येथे मॅंगनिज आणायला आठ डब्यांची मालगाडी निघाली. कैची माईननंतर हा रेल्वेमार्ग नागपूर-जबलपूर राष्टीय महामार्ग क्र.७ वरून जातो. त्याठिकाणी रेल्वे फाटक नाही. त्यामुळे मालगाडी महामार्गाजवळ पोहोचताच स्टेशन मास्टर मनिषकुमार, रेल्वे कर्मचारी शिवराज जयसिंग, चैतलाल बसिने, गॅंगमन धनराम यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतुक रोखून धरण्यासाठी हातात टॉर्च घेऊन वाहनचालकांना इशारा देत होते.

दोन्हीकडची वाहकतूक रोखलेली असताना सिवनी (म.प्र.) कडून येत असलेल्या चारचाकी वाहनच्या चालकाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून आपले वाहन रूळांवरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मालगाडीच्या शेवटच्या डब्यावर त्यांचे वाहन जोरात धडकले. त्यात वाहनचालक आणि त्याचा सहप्रवासी दोघेही जखमी झाले. लगेच अपघाताची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. पोलिस कर्मचारी संजय तिवारी, राजू भोयर, मनसर चौकीचे गजानन उकेबोंद्रे यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना रूग्णालयात पाठवले. वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस हवालदार रावते करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT