cbi sakal media
नागपूर

CBI Raid : नीरी’मध्ये सीबीआय छापा

चार संशोधकांसह कंपन्यांची चौकशी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः नागपुरातील वर्धा मार्गावर असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) कार्यालयावर बुधवारी (ता.१०) सकाळच्या सुमारास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. ‘नीरी’चे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती केल्याप्रकरणी हा छापा टाकून चौकशी केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नीरी’चे तत्कालिन संचालक डॉ. राकेश कुमार यांनी खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे आपल्या कुटुंबियांसह अनेक ओळखीच्या लोकांची ‘नीरी’मध्ये विविध पदावर नेमणूक केली होती. याशिवाय बनावट कपंनीच्या नावे वेतन काढून आर्थिक अनियमितता केल्याची बाब समोर आली होती. यामध्ये संशोधकांच्या पदांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, संशोधनासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान याबाबत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) अनेक तक्रारी देण्यात आलेल्या होत्या. त्या आधारे सीएसआयआरने या तक्रारीच्या आधारे चौकशी समिती लावून त्यांचे निलबंन केले होते. त्यानुसार डॉ. राकेश कुमार यांच्याशिवाय सीबीआय या कथित गैरव्यवहारात सहभागी असलेल्या चार शास्त्रज्ञांसह दहा आरोपींविरोधात तीन स्वतंत्र खटले नोंदवित पाच खासगी कंपन्यावर भ्रष्टाचार आणि राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या आरोप लावण्यात आला. या आरोपानुसार, चौकशी करण्यासाठी बुधवारी सीबीआयने चार राज्यातील १७ ठिकाणी छापे टाकून छापे टाकून शोधमोहिम सुरू केली. त्यातून नागपुरात सीबीआयच्या पथकाने सीएसआयआरच्या संशोधन कक्षाचे वरिष्ठ संशोधक आणि संचालक डॉ. आत्या कपले, डॉ. रितेश विजय, वरिष्ठ संशोधक डॉ. सुनील गुलिया, डॉ. संजीव कुमार गोयल यांची चौकशी करण्यात आली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT