नागपूर

परीक्षा रद्द पण प्रात्यक्षिक होणारच; सीबीएसई प्रादेशिक विभागाचे आदेश

मंगेश गोमासे

नागपूर : केंद्रीय शिक्षण मंडळाद्वारे (Central education department) देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या (10th and 12th board exams) परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्याच्या अनुषंगाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical of HSC) घेऊन त्यांचे गुण अपलोड करण्यास सीबीएसई प्रादेशिक विभागाने (CBSE) शाळांना कळविले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सीबीएसई शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहून प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. (CBSE decided to take practical exam for HSC result in Nagpur)

राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यातुन सीबीएसईनेही दहावी आणि आता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला. राज्य मंडळानेही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंतरिक गुण आणि प्रात्यक्षिकांचे गुण बोर्डाकडे पाठवायचे आहेत. मात्र, बारावीचे ५० टक्के प्रात्यक्षिक परीक्षा व्हायच्या आहेत. मात्र, शहरात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने यापूर्वी पुणे विभागाने दिलेल्या आदेशावर प्रात्यक्षिक परीक्षा घेता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

आता कोरोनाचा रुग्णात लक्षणिय घट झालेली आहे. त्यामुळे पुणे विभागाने पुन्हा आदेश पाठवून प्रात्यक्षिक उरकण्यात यावे असे आदेश दिले. त्यानुसार शहरातील सर्वच शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास सुरूवात झालेली आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनामुळे अद्यापही सर्वच जिल्ह्यात टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायचा कशा आणि मुलांना शाळेत पाठवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना बोलावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुणांकनासाठी आवश्‍यक

विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्याने त्यांना कोणत्या आधारावर गुण द्यावे यासाठी प्रात्यक्षिक घेणे आवश्‍यक आहे. शाळा कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुनच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एका सीबीएसई शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले.

(CBSE decided to take practical exam for HSC result in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT