central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpur esakal
नागपूर

Nagpur News : १३० किलोमीटर प्रती तास गतीने चालविण्याची चाचणी यशस्वी; विदर्भ, गीतांजली एक्स्प्रेस आता धावणार सुसाट

चाचणी करण्यात आलेल्या सहा गाड्यांसह इगतपुरी-भुसावळ-बडनेरा मार्गावर एकूण ६७ गाड्या १३० किलोमीटर प्रति तास गतीने चालविण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य रेल्वेने इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या ५२६.७२ किलोमीटर अंतराच्या मार्गावर सुधारणा केली आहे. या मार्गावर नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस या गाड्यांना १३० किलोमीटर प्रती तास गतीने चालविण्यात चाचणी यशस्वी झाली.

मध्य रेल्वेने या मार्गावरील वरील गाड्यांची गती नियमित सुद्धा केली आहे. त्यामुळे आता दुरंतो, विदर्भ, गीतांजली एक्स्प्रेस सुसाट धावणार आहेत. इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या ५२६.७२ किलोमीटर अंतराच्या अप आणि डाऊन मार्गावर काही सुधारणा करण्यात आली आहे.

या मार्गावर १२२८९ मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, १२२९० नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आणि १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस या सहा गाड्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान १३० किलोमीटर प्रति तास गतीने चालविण्याची चाचणी घेण्यात आली.

ही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे मुंबईवरून येणाऱ्या गाड्यांची सरासरी २८ मिनिटे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची सरासरी ३० मिनिटे वेळेची बचत झाली. चाचणी यशस्वी झाल्यामुळे वरील सहा एक्स्प्रेस नियमित १३० किलोमीटर प्रति तास गतीने नियमित धावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता दुरंतो, विदर्भ, गीतांजली एक्स्प्रेस सुसाट धावणार आहेत. चाचणी करण्यात आलेल्या सहा गाड्यांसह इगतपुरी-भुसावळ-बडनेरा मार्गावर एकूण ६७ गाड्या १३० किलोमीटर प्रति तास गतीने चालविण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

Latest Maharashtra News Updates : मतदारांवर प्रभाव टाकणारा राजकीय प्रचार केल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT