Nagpur Factory Blast  Sakal
नागपूर

Nagpur Factory Blast : ‘चामुंडी एक्सप्लोसिव्ह’ समोर मृतदेहांसह ठिय्या; २५ लाखांची मदत जाहीर; मालक व व्यवस्थापकाला अटक

कंपनीचे महाव्यवस्थापक संजय तिडके यांनी पीडित कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : अमरावती रोडवरील धामना गावाशेजारी असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील भीषण स्फोटात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी (ता.१४) या मृत कामगारांचे मृतदेह गावात आणताना कंपनीसमोर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रोखले व ठिय्या दिला. यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले.

यानंतर कंपनीच्या महाव्यवस्थापकाने कामगारांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली. यानंतर मृतदेह गावात नेण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी कंपनी मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

गुरुवारी झालेल्या स्फोटात प्रांजली मोदरे (२२),प्राची फलके (२०), वैशाली क्षीरसागर (२०) ,मोनाली अलोणे (२७),पन्नालाल बंदेवार (५०) रा. सातनवरी व शीतल चटप (३०) यांचा मृत्यू झाला होता. तर दानसा मरस्कोल्हे (वय २६),श्रद्धा पाटील (वय २२),

प्रमोद चावरे (२५) रा.नेरी हे गंभीर जखमी असून त्यांना नागपुरातील दंदे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धामणा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अमरावती मार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते.

पोलिस बंदोबस्त; ग्रामस्थ झाले आक्रमक

शुक्रवारी सकाळपासूनच धामणा गावात बंदोबस्त होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास मृतदेहांसह रुग्णवाहिका कंपनी जवळ आली. तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह अडवून धरले. कंपनी व्यवस्थापनाकडून जोपर्यंत आर्थिक मदत जाहीर होत नाही, तोपर्यंत मृतदेह नेऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

पोलिसांवर पुन्हा ताण निर्माण झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे व तहसीलदार सचिन कुमावत उपस्थित होते. कंपनीचे महाव्यवस्थापक संजय तिडके यांच्याशी चर्चा केली.

कंपनीचे महाव्यवस्थापक संजय तिडके यांनी पीडित कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा केली. २५ लाखांचा धनादेश मृतांच्या कुटुंबीयांना तिडके यांनी दिला.यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाल्यानंतर मृतदेह गावात नेण्यात आले. पाच मृतदेहांवर एकाचवेळी सायंकाळी ६ च्या सुमारास अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कंपनी मालकास अटक व सुटका

हिंगणा पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी कंपनी मालक जयशिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख विरुद्ध भादंवी ३०४ व २८९ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृतांची संख्या सातवर

धामना स्फोटातील जखमी दानसा मरस्कोल्हे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावरून सात झाली आहे. स्फोटा गंभीर जखमी झाल्याने दानसा यांना दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. यामुळे मरसकोल्हे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT