Chandrakant Patil  Chandrakant Patil
नागपूर

‘समोरच्या उमेदवाराला हलक्यात घेऊ नका; सतर्क राहा’

चंद्रकांत पाटील यांनी सर्व प्रथम विधान परिषदेच्या निवडणुकीच स्थिती जाणून घेतली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचे (Legislative Council elections) बारकाईने नियोजन करा, समोरच्या उमेदवाराला हलक्यात घेऊ नका, सतर्क राहा, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्हातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

खाजगी कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील नागपूरला आले होते. नागपूर विमानतळावरून ते महापालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे (Avinash Thackeray) यांच्या घरी गेले. या दरम्यान त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, विधान परिषदेचे उमेदवार तसेच माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शहरातील आजी-माजी आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी सर्व प्रथम विधान परिषदेच्या निवडणुकीच स्थिती जाणून घेतली. मतांचे समीकरण समजावून घेतले. भाजपचे सुमारे साठ मते अधिक असले तरी आपण सतर्क राहणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. प्रत्येक मतदारासोबत संपर्क साधा, कोणी नाराज असेल तर त्याची तत्काळ दखल घ्या, त्याची नाराजी दूर करा, आपले एकही मत दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत ((Legislative Council elections)) पसंती क्रमाने मतदान होते. यात मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरण्याचा धोका असतो. त्यामुळे आपल्या मतदाराला निवडणुकीची पद्धत समजावून सांगा. आपले एकही मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या, अशाही सूचना चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. चंद्रकांत पाटील सुमारे दीड तास अविनाश ठाकरे यांच्याकडे थांबले होते. यानंतर नागपूर विमानतळावरून ते रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT