chandrashekhar bawankule sakal
नागपूर

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे पद धोक्यात? गृह जिल्ह्यातच महायुती झाली पराभूत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गृह जिल्ह्यातच महायुतीच्या उमेदवार पराभूत झाल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातील १० पैकी नागपूर आणि अकोला या दोनच जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांचे वास्तव्यही याच मतदारसंघात आहेत. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून घेण्यासाठी बराच प्रयत्न केला. बावनकुळे शेवटपर्यंत प्रयत्नरत आणि आशावादी होते. एवढेच नव्हे तर मोठा भाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे सोपवाला अशी विनंतीसुद्धा केली होती.

महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना त्यांनी आधीच शब्द दिला होता. जागेचा तिढा सुटत नसल्याने पारवे यांनी भाजपात प्रवेश केला नाही. शिंदे यांनी मात्र रामटेक सोडण्यास नकार दिला. शेवटी उमेदवार बदलण्यास ते राजी झाले. विद्यमान खासदार यांचा पत्ता कट करून शिंदे सेनेने पारवे यांना उमेदवार केले.

यासाठी बावनकुळे यांनी आग्रह धरला होता. पारवे यांना विजयी करण्याची हमी बावनकुळे यांनी घेतली होती. सर्वेक्षणाचे दाखले देऊन तुमाने यांना बदलण्यात आले. एवढ्या सारा खटाटोप करूनही पारवे यांच्या नावाचा गुलाल भाजपला उधळता आला नाही. काँग्रेसने महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांनी महायुतीला धूळ चारली.

भंडारा आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्याचे बावनकुळे पालकमंत्री होते. यासह गडचिरोली आणि अमरावती येथेही भाजपला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे बावनकुळे यांच्या नेतृत्वात यापूर्वी झालेल्या नागपूर विभागीय शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या सर्व पराभवाचे खापर प्रदेशाध्यक्ष या नात्याने बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT