Chandrashekhar Bawankule Viral Video Of Audi Hit And Run In Nagpur Esakal
नागपूर

Chandrashekhar Bawankule: "ती गाडी माझ्या मुलाच्या नावे," नागपूर हिट अँड रन प्रकरणी काय म्हणाले बावनकुळे? पाहा व्हिडिओ

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावावर असलेल्या आलिशान कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली, त्यानंतर चालकासह दोघांना अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एक वाजता ऑडी कारने तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि नंतर मोपेडला धडक दिली, त्यात दोन दुचाकीस्वार तरुण जखमी झाले.

काय म्हणाले बावनकुळे?

दरम्यान या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी एक्स अकाउंटवर माध्यमांशी संवाद साधलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो."

दरम्यान या प्रकरणावर मत व्यक्त करताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, "काल भाजपाच्या बड्या नेत्याच्या मुलाने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले. मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था भाजपाच्या दावणीला बांधलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

"राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत या सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल. आता जनताच या सरकारला उत्तर देईल," असे लोंढे पुढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Pune to Bangkok flight: गुड न्यूज! पुण्यातून बँकॉक अन् दुबई विमानसेवेला मंजुरी; 'या' तारखेपासून होणार उड्डाण

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

IND vs BAN: विराट आऊट... रोहित नाराज; मात्र चेन्नईचे चाहते सुस्साट, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT