नागपूर

Maratha Reservation: ओबीसींसह सर्व समाजाला न्याय, कोणावरच अन्याय नाही! बावनकुळे यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार सकारात्मकच होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation: ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णयही राज्य सरकार घेणार नाही व घेतलेला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार सकारात्मकच होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सांगता केल्यानंतर बावनकुळे यांनी चांगला मार्ग यातून काढण्यात आला असल्याचे सांगितले. ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे.

राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत. तीच भूमिका कायम आहे, असेही बावनकुळे म्हणाले. (Latest Marathi News)

ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही ओबीसींचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता जरांगी पाटील उपोषणावर बसले होते. त्यानंतर आंतरावाली सराटी येथून ते मोर्चाने मुंबईत निघाले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून मराठा आणि ओबीसी यापैकी कोणीही नाराज होणार नाही असा तोडगा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT