representative image canva
नागपूर

पालकांनो सावधान..! तुमचाही मुलगा मोबाईल गेम खेळत नाही ना?

भाग्यश्री राऊत

नागपूर : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विद्यार्थी मोबाईलवरून ऑनलाइन क्लासेस करीत आहेत. त्यातूनच मोबाईलचे वेड मुलांना एवढे लागले की पैसे भरून गेम्स ते डाऊनलोड करीत आहेत. गेमचे कुपन विकत घेण्यासाठी काही मुले चक्क पालकांच्या खिशावर डल्ला मारायला लागले आहेत. अशाप्रकारची एक घटना हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. एका मुलाने मामाच्या खिशातील पैसे चोरून चक्क मोबाईल स्टोअर्समधून ५० हजार रुपयांचे कुपन विकत घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वर परिसरात एक बिजनेसमन राहतो. त्याच्या बहिणीचा १३ वर्षांचा मुलगा प्रीत (बदललेले नाव) त्याच्याकडे शिक्षणासाठी राहतो. त्याच्या वर्गात शिकणारे दोन मुले त्याच्या मामाच्या वस्तीत राहतात. तिघेही एकाच शाळेत शिकत असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. तिघेही मोबाईलवर ऑनलाइन क्लास करीत होते. क्लास संपल्यानंतर आपापल्या मोबाईलमध्ये गेम डाऊनलोड करून खेळत होते. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेला रीडिंग गेम’ तिघांनीही डाऊनलोड केला. गेम खेळत असताना पुढची स्टेप गाठण्यासाठी कुपन स्क्रॅच विकत घ्यावे लागते. त्यामधील कोड मोबाईलमधील गेममध्ये भरावा लागतो. ते कुपन मोबाईल स्टोअर्सवर उपलब्ध असून त्याची किंमत चक्क ५००, १००० आणि २००० रुपये आहे. तीनपैकी एका मुलाने मामाच्या खिशातील जवळपास ५० हजार रुपये चोरले. तर एकाने वडिलांच्या खिशातून ५ हजार रुपये चोरले. त्यातून तीनही मित्रांसाठी गेम कुपन्स खरेदी केले.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

अशा उघडकीस आली घटना

बिजनेसमन असलेल्या मामाने बाहेर पडण्यापूर्वी पैसे तपासले असता खिसा रिकामा दिसला. त्याने घरात शोधाशोध केली तसेच कुटुंबीयांनाही विचारणा केली. भाचा प्रीतकडे खूप सारे कुपन्स दिसल्यामुळे त्याला विचारणा केली. तर तो भीतीपोटी सांगायला तयार नव्हता. शेवटी प्रेमाने विचारणा केल्यानंतर मोबाईल गेमचे कुपन्स खरेदी केल्याचे उघडकीस आले.

काय काळजी घ्यावी -

एटीएम कार्ड, डेबीट कार्ड आणि बॅंक खात्याशी मोबाईल क्रमांक अटॅच असल्यामुळे मोबाईलमधून चुकीने काही गेम्सवर क्लिक केल्यास थेट बॅंकेतून पैसे डिडक्ट होतात. तसेच ऑनलाईल शॉपींग अ‌ॅप किंवा वेबसाईटवर एखाद्या प्रॉडक्टवर क्लिक झाल्यास ते प्रॉडक्ट ऑर्डर होऊन खात्यातून पैसे कट होतात.

हेही वाचा - मोठा रंगमंच, डौलदार नेपथ्य अन् त्यावरील अभिनय, कुठं हरवलंय सर्व?

ऑनलाइन क्लाससाठी दिलेल्या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी होत आहे का? यावर पालकांनी लक्ष ठेवावे. अनेकदा मोबाइलमध्ये जाहिराती पॉपअप होतात, त्यावर मुलांनी क्लिक केल्यास थेट बॅंकेतून पैसे कट होतात. अशा स्थितीत घाबरू नका. थेट बॅंकेशी संपर्क करा. साबयर पोलिस ठाण्यात तक्रार करा.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT