Children demand toys basic facilities ground sakal
नागपूर

Nagpur : खेळाला जावं तर पायाला दगडं लागतात, काटे रूततात बच्चेकंपनीने मांडली कैफियत!

मैदानात मूलभूत सुविधांसह खेळणी लावण्याची बालगोपालांची मागणी

Akhilesh Ganvir

समर्थनगर मैदान : मैदानात आलो आणि खेळायला सुरुवात केली की पायाला दगडं टोचतात. अनेकदा चपलेतून काटे पायात शिरतात. मग आम्ही खेळायचे कसे, असा प्रश्न समर्थनगर मैदानावर जमलेल्या बालगोपालांनी उपस्थित केला. झुडपामध्ये चेंडू गेल्यावर काटे रूततात.

त्यामुळे बऱ्याचवेळा जखमा होऊन रक्तबंबाळ व्हावे लागते, असे सांगत किमान मैदानाची साफसफाई तरी झाली पाहिजे, अशी मागणी परिसरातील मनीष वानखेडे, वंश राऊत, प्रथमेश हाडके, यश लेहगांवकर, आर्यन कुलकर्णी आणि त्यांच्या अन्य मित्रांनी केली.

सध्या बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. काही शाळांना पुढच्या आठवड्यात सुट्या लागतील. त्यामुळे लहान मुले मैदानाकडे वळू लागले आहेत. परंतु लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १६ मधील समर्थनगर मैदानावर साध्या मूलभूत सुविधा नसल्याने स्थानिकांची लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनावर नाराजी आहे. घसरगुंडीची स्लाईड तसेच झुले व इतर साहित्य नसल्याने बच्चे कंपनीचा मोठा हिरमोड होतो.

मनीष वानखेडे म्हणाला, क्रिकेट आमच्या आवडीचा खेळ असला तरी त्यासाठी मैदान चांगले पाहिजे ना. मैदानावर काहीच नसल्याने आम्ही कसेबसे क्रिकेट खेळतो. मात्र, तिथेही अडचणी आहेत. क्रिकेटसाठी चांगली पीच नाही. मैदानावर सर्वत्र दगडधोंडे आहेत. खेळताना ते पायाला लागतात. त्यामुळे बरेच जण जखमीसुद्धा झाले.

वंश राऊत म्हणाला, मैदानाच्या सभोवताल काटेरी झुडपे वाढली आहेत. तेथे बॉल गेल्यानंतर भीती वाटते. हाताला काटे रूततात. मैदानाची साफसफाई नियमितपणे केली जात नाही. प्रथमेश हाडकेनेही अडचणी मांडल्या. तो म्हणाला, मैदानाच्या काही भागात जंगली गवत वाढलेले आहे. ते काढले जात नाही. कचऱ्यात खेळावे लागते. फुटबॉल मैदानासारखे मैदान असायला हवे.

जेणेकरून आम्ही क्रिकेट आणि फुटबॉल खेळू शकू. याशिवाय घसरगुंडी, झुले आणि लहान मुलांसाठी खेळणीचीही आवश्यकता आहे. दुर्दैवाने या मैदानावर असे काहीच दिसत नाही. त्यामुळे आम्ही लहान्यांनी खेळायचे तरी कसे? मोठ्या व ज्येष्ठ व्यक्तींकरिता ग्रीन जीम आणि फिरण्यासाठी जागा आहे. मात्र, आमच्याकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी तक्रार मुलांनी केली.

पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाकडे लक्ष द्या हो

अजनी चौकात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला. अतिशय वर्दळीच्या या चौकातून विमानतळाकडे जाणाऱ्या व्हीव्हीआयपींची ये-जा असते. जी-२० च्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, बाजूलाच असलेल्या राजीव गांधी यांच्या पुतळा परिसराच्या दुरवस्थेकडे संबंधितांचे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. पुतळ्याजवळील टाइल्स उखडल्या आहेत.

"राजीव गांधी अमर रहे’ या नावाने तयार केलेल्या ‘ओट्या’ची नियमित स्वच्छता होत नाही. लिहिण्यात आलेल्या नावाचा रंगही उडाला आहे. सौंदर्यीकरण म्हणून परिसरात लावलेले गवतही सुकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भागातील लाईटही चोरट्यांनी लंपास केले आहेत. पुतळ्या परिसरात दारूच्या बॉटल्स पडलेल्या असतात. माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.

ग्रीन जीमकडे दुर्लक्ष

लाखो रुपये खर्च करून समर्थनगर मैदानाच्या एका कोपऱ्यात ग्रीन जीम लावण्यात आली. मात्र, येथील टाइल्स उखडल्या आहेत. त्यातून लोखंडी सळाखी बाहेर निघाल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. टाइल्सच्या भेगातून गवत वाढू लागले आहे. त्यामुळे बांधकाम किती निकृष्ट आहे, हे लक्षात येते. बाजूलाच कचरा साचलेला आहे. त्यामुळे या मैदानावरील ग्रीन जीमला घरघर लागली आहे.

-अखिलेश गणवीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT