Chitrarath  sakal
नागपूर

Chitrarath Republic Day : तीन राज्यांच्या चित्ररथाला वैदर्भीय शिल्पकारांचे हात

महाराष्ट्राने साकारली शक्तिपीठे; कर्तव्यपथावर आज रंगीत तालिम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रत्येक प्रजासत्ताकदिनी दिमाखात अवतरणारे चित्ररथ पाहिल्याने प्रत्येक देशवासीयांची छाती अभिमानाने भरून येते. वैदर्भीयांसाठी मात्र त्याहून अभिमानास्पद परमोच्च असा हा क्षण असणार आहे. कारण, महाराष्ट्रासह देशातील तीन राज्यांचे चित्ररथ तयार करण्याचा मान वैदर्भीय कलावंतांना मिळाला आहे.

महाराष्ट्रातील ‘साडेतीन शक्तिपीठ’, उत्तरप्रदेशचा ‘अयोध्या दीपोत्सव’ आणि आसामच्या ‘कामाख्या देवीचे मंदिर’ या संकल्पनेवर आधारित हे चित्ररथ कर्तव्यपथावर झळकणार आहेत.

नागपूरच्या नरेश चरडे व पंकज इंगळे संचालित शुभ ॲड्स या कंपनीला या तीनही राज्याचा कंत्राट मिळाला असून यवतमाळ व वर्धा येथील ३० कलावंतांचा समूह दिवसरात्र मेहनत घेत हे चित्ररथ साकारत आहेत.

तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर, यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा व श्रीपाद भोंगाडे (हिंगणघाट, जि. वर्धा) हस्तकला विभागाचा प्रमुख आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये,

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापुरी तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या शक्तिपीठांचा समावेश आहे. वैदर्भीय कलावंतांच्या हातांनी घडलेली हुबेहुब शिल्प, तितक्याच सुंदर प्रतिमा आणि स्त्री सामर्थ्याचे दर्शन देशवासीयांना होणार आहे. पूर्वीच्या राजपथ आता कर्तव्यपथ म्हणून ओळख मिळाली असून या नामकरणानंतरचे हे पहिलेच पथसंचलन असणार आहे.

सात दिवसांमध्ये चित्ररथ साकार

लहानात लहान शिल्प साकारायचे झाल्यास त्यासाठी किमान पंधरा दिवसांचा अवधी अपेक्षित असतो. मात्र, देशसेवा या भावनेसह प्रेरित या कलावंतांनी केवळ सात दिवसांमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. ही सर्व शिल्प बुधवारी (ता. १८) दिल्ली येथे पोहोचले असून सध्या ती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. तर, उद्या (ता. २३) कतर्व्यपथावर रंगीत तालीम होणार आहे.

नागपूरकर कंपनीला पाच राज्यांचे काम

आधीच्या वर्षी जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘पॉप्युलर चॉईस’ विभागात पारितोषिक पटकावले होते. याच यशामुळे नागपूरच्या शुभ ॲड्सला यावर्षी महाराष्ट्रासह थेट ‘उत्तर प्रदेश’, ‘आसाम’, ‘पश्‍चिम बंगाल’ आणि ‘अरुणाचल प्रदेश’ या पाच राज्याचा चित्ररथ साकारण्याचा मान मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सत्तर वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच राज्याला इतक्या मोठ्या प्रमाणात काम मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT