चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांबाबत आज बरीच जागरूकता आली आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग, लठ्ठपणा या आजारांबाबत खूपच संवेदनशीलपणे विचार करण्यात येतो. परंतु, वंध्यत्व या आजाराकडे आजवर दुर्लक्षच झाल्याचे दिसून येते. केवळ दाम्पत्य जीवनावरच नव्हे तर, संपूर्ण कौटुंबिक सुखावर परिणाम करणाऱ्या या आजाराबाबत मात्र आता जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागपुरात प्रथमच या विषयातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डाॅ. मालविका तांबे वंध्यत्व आजाराबाबत संवाद साधणार असून, आपल्या शंकांचे निरसन करणार आहेत. त्यासाठी ८ डिसेंबरची सायंकाळ आजपासूनच बुक करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
श्रीगुरू डाॅ. बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने गर्भसंस्काराचा वारसा लाभलेल्या डाॅ. मालविका तांबे या येत्या ८ डिसेंबरला नागपुरात गर्भधारणा ते वंध्यत्व आदी विषयांवर आपल्याला आजवर पडलेल्या प्रत्येकच प्रश्नाचे निरसन करतील. वंध्यत्व हा आजार खूपच चिंतेचा झाला आहे. जन्माला आल्यानंतर आजार झाला तर त्यावर संशोधन करून, उपचार शोधून आजार आटोक्यात आणता येतो; परंतु जन्माला घालताच आले नाही तर, संगळचं संपणार का?, असा प्रश्न वंध्यत्व या आजाराबाबत पडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा गंभीर परिणाम स्त्री आणि पुरुषाच्या प्रजननसंस्थेवर झाल्याचे दिसून येते. यातून प्रचंड नैराश्य येते. संपूर्ण विदर्भात वंध्यत्वामुळे कुणीही नैराश्याच्या यादीत असू नये म्हणून डाॅ. मालविका तांबे यांच्या या संवादाचे आयोजन उपराजधानी नागपूर येथे करण्यात येत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे ताण वाढले आहेत. कामात व्यग्र असल्यामुळे रात्रीची झोपही व्यवस्थित होत नाही. सकाळी कामाच्या गडबडीत चालणे, व्यायाम यासाठीही वेळ काढता येत नाही. आहारासारख्या सर्वात महत्त्वाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर तडजोड केली जाते. घरी केलेला सात्त्विक आहार सोडून अनेकदा बाहेरचे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा आणि अतिप्रमाणात आहार घेण्याचेही प्रमाण वाढले आहे. एवढेच काय तर शहरासारख्या ठिकाणी पाच दिवस राबराब राबायचे आणि दोन दिवसांचा ‘विक-एंड’ दणक्यात साजरा करण्याची फॅशन सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवार म्हणजे जणू काही मुक्त आणि स्वच्छंदी जीवन जगण्यासाठीच कॅलेंडरमध्ये टाकले आहेत, असा समज अनेकांनी करून घेतला आहे.
मनसोक्त धूम्रपान आणि मद्यपान करून ऐश करण्याची अनोखी तऱ्हा सुरू झाल्याचे अनेक शहरांमध्ये दिसते. हे लोण आता तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचायला लागले आहे. त्यामुळे अनैसर्गिक रसायनांचा वापर वाढला. या सर्वांचा एकंदरीत परिणाम ‘संतुलन आयुर्वेद फिर्टिलिटी एक्स्पिरिअन्स’ म्हणजेच आपल्या शरीरात असलेली सगळ्यात महत्त्वाची शक्ती ज्याला शुक्र म्हटले जाते, त्यावर होत आहे. बेताल वागण्यामुळे शुक्रची पातळी कशी काय व्यवस्थित राहू शकेल? हे हेरूनच श्रीगुरू डाॅ. बालाजी तांबे यांनी त्यांच्या संशोधनातून आणि त्यांनी अनेक दशके केलेल्या कार्यातून ‘इझी आणि नॅचरल’ प्रणाली सिद्ध झाली आहे. जी संपूर्णपणे आयुर्वेदिक सिद्धांतावर आधारित आहे. या सिद्धांताची उच्च अनुभूती प्राप्त असलेल्या डाॅ. मालविका तांबे येत्या
८ डिसेंबर रोजी नागपूर येथे आशेचा एक नवा कवडसा उघडण्यासाठी येत आहेत.
वंध्यत्वावर मात करून दाम्पत्याला मातृत्व-पितृत्वाचे वरदान हवे असेल तर, कुठले शस्त्र चालवावे, याचा पर्याय व्यवस्थित विचारच करून निवडायला हवा, हेच वैदर्भीयांना डाॅ. मालविका तांबे यांच्या संवादातून उलगडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.