नागपूर : जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक (Zilla Parishad by election) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितच लढण्याचा (Congress and NCP fight together) निर्णय सोमवारी घेतला. यासाठी सार्वत्रिक निवडणुकीतील फॉर्म्युला कायम ठेवण्यात येणार आहे. दोन्ही काँग्रेस आपआपल्या जागा कायम ठेवणार (Will retain space) आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार नाही अशी चर्चा होती. (Congress-and-NCP-will-contest-ZP-elections-together)
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दुपारी शेतकरी संघाच्या सभागृहात बैठक झाली. यात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीच्या वतीने रमेश बंग, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. १६ जागांवर पोट निवडणूक होणार आहे. ओबीसींसाठी राखीव जागेवर विजयी झालेल्या काँग्रेसच्या सात, राष्ट्रवादीचे चार, भाजपचे चार आणि शेकापच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार नाही अशी चर्चा होती. जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा देताना काँग्रेसने दुय्यम स्थान दिल्याने राष्ट्रवादी नाराज होती. सर्व पक्ष स्वबळावर लढतील असे चित्र होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ही कोंडी फुटली. सार्वत्रिक निवडणुकीत ज्यांच्याकडे जागा होत्या त्या त्यांच्याच पक्षाकडे राहणार आहेत.
शिवसेनेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे
शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप त्यावर कुठलाही निर्णय कळविण्यात आला नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीत स्थान राहणार नाही हे स्पष्ट झाले.
(Congress-and-NCP-will-contest-ZP-elections-together)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.