Congress mukul wasnik on Alliances with vba Lok sabha election 2024 Politics  
नागपूर

Lok Sabha Election : 'वंचितसाठी चर्चेची दारे अद्याप खुली, शेवटच्या दिवशी काहीही शक्य'; काँग्रेस अजूनही प्रतीक्षेत?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. याबाबत अनेक चर्चा झाल्या आणि अजून सुरू आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आमची दारे खुली राहणार असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व खासदार मुकुल वासनिक यांनी सांगितले.

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी वंचित आघाडीची आहे. येथून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत आहे. काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून काँग्रेस आणि वंचितमध्ये मोठा वाद सुरू आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबडेकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकमेकांना भाजपचे हस्तक म्हटले आहे.

त्यामुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वंचितने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा प्रचार थांबविण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात मुकुल वासनिक यांचे वक्तव्य आघाडीसाठी आशादायी मानले जाते. अकोला येथून काँग्रेस त्यांचा उमेदवार मागे घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

भाजप आणि शिवसेना - राष्ट्रवादी यांच्यात अद्याप १० जागांवर समझोता झालेला नाही. मात्र तुम्ही काँग्रेसचेच विचारता. सांगलीचा निर्णय लवकरच निकाली निघेल. आमची चांगली चर्चा सुरू आहे. कोणाला चिंता करण्याची गरज नाही, असेही मुकुल वासनिक म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT