नागपूर

वडिलांच्या कोरोना मृत्यूने पोरं झाली पोरकी; सर्वांचे डोळे पाणावले

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : दहा वर्षांपूर्वी काही कारणास्तव आई घर सोडून निघून गेली. दोन वर्षांची काजल असताना तिचे आणि इतर दोघांचे पालनपोषण वडिलांनी केले. कुडाच्या झोपडीत राहून मोलमजुरी करून लेकरांचे पालनपोषण करीत त्यांना पाळले. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाची (coronavirus) भयंकर लाट उसळली होती. त्यातच वडिलांचा मृत्यू (Father's death) झाला. मात्र, वडिलांच्या छत्रछायेत लहानाची मोठी झालेली पोरं पोरकी झाली. (Coronas father's death and child go to orphanage)

अरुण दद्दू मोहनकर असे कोरोनाने मृत झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांना प्रणय (वय १८), आचल (वय १५) आणि काजल (वय १२) अशी तीन मुले आहेत. वडिलाच्या मृत्यूने त्यांच्यावर जणू आभाळच कोसल्यागत झाले. मोठा मुलगा प्रणय दहावी आणि बारावीत प्रथम श्रेणीत पास असून सध्या शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. लहान बहिणीचे पालनपोषण स्वतःचे व त्यांचे शिक्षण कसे करायचे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

वडील अरुण आठ दिवस आजाराशी लढले. कुटुंबातील मोठी आई आशाबाई ही जेव्हा त्यांच्या घरी विचारपूस करायला गेली, तेव्हा घरी चूल पेटलीच नव्हती. धान्याचे डबे रिकामे होते. तिला मनात दुखले आणि तिने धान्य दिले. अरुणचा मरणधरण तिनेच केले. त्याच्या जाण्याला सव्वा महिना होतो. तेव्हापासून तिन्ही मुले आशाबाईच्या घरीच होती. पण पुढील त्यांची जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नव्हते. गावातील तरुणांच्या व्हॉट्सअप ग्रुपने यावर चर्चा करून एकदा मदत केली.

कामाला जाऊन बहिणीचे पालनपोषण करण्याची हिंमत प्रणयनी दाखवली. पण प्रश्न होता शिक्षणाचा. आता या पोरके झालेल्यांना आधार कुणाचा, ही बाब बालसंरक्षण समितीच्या लक्षात आली. नुकतेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे देखील गावात येऊन गेले. त्यांच्या कानी सरपंच भगवान बावनकुळे यांनी विषय मांडला. त्यानुसार दोन्ही मुलींचे पुढील शिक्षण व राहण्याची सुविधा अनाथालयात राहून करायचे ठरविले.

प्रणय अठरा वर्षांवरील असून देखील दोन्ही बहिणीच्या संपर्कात राहावा, म्हणून त्याला मुलाच्या अनाथालयात आणि मुलींना मुलीच्या अनाथालयात ठेवण्याचे ठरविले. त्यांची आज नागपूर येथील अनाथालयात रवानगी करण्यात आली. आशाबाई हिने पोटच्या पोरासारखे समजून त्यांना कपडेलत्ते, खाण्याचे पदार्थ बनवून दिले.

अश्रू आवळीत निरोप

यावेळी घराशेजारील बऱ्याच महिला जमल्या होत्या. सर्वांचे डोळे पाणावले होते. मुलांनी देखील अश्रू आवळीत निरोप घेतला. नुकतेच आमदार टेकचंद सावरकर यांना सांत्वना देण्यासाठी आले होते. प्रणय याला आयटीआयचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी लावण्याची हमी दिली. मात्र, सामाजिक दायित्व जपत आर्थिक मदत करण्याचा पाझर त्यांना फुटला नाही.

(Coronas father's death and child go to orphanage)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT