नागपूर

Corona Test: कोरोना चाचणीसाठी नागपुरात ४६ केंद्र! आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज

कोरोना विषाणूच्या ‘जेएन-वन' व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Corona Centre: कोरोना विषाणूच्या ‘जेएन-वन' व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.


कोरोनाच्या जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजनांसंदर्भात आज आयुक्त सभाकक्षात आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. संजय गुज्जनवार उपस्थित होते. आंचल गोयल यांनी कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली.

चाचण्यांवर द्यावा भर
कोरोना साखळीवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे सांगत सर्वप्रथम कोरोना संशयित तसेच सौम्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले. याशिवाय रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटला न घाबरता सतर्कता बाळगावी सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त गोयल यांनी केले.(Latest Marathi News)

कोरोना चाचणी केंद्रांची यादी
लक्ष्मीनगर झोन
खामला यूपीएचसी, खामला
कामगारनगर यूपीएचसी, कामगारनगर
जयताळा यूपीएचसी, जयताळा
सोनेगाव यूपीएचसी, सोनेगाव

धरमपेठ झोन
फुटाळा यूपीएचसी गल्ली नं. ३ अमरावती रोड फुटाळा
डीक यूपीएचसी व्हीआयपी रोड वनामतीजवळ
तेलंगखेडी यूपीएचसी सुदामनगरी वर्मा ले-आऊट अंबाझरी
केटी नगर यूपीएचसी केटीनगर
हजारी पहाड यूपीएचसी हजारी पहाड लायब्ररी
दाभा यूपीएचसी जुना चुंगी नाका नं. १ दाभा वॉटर टॅंकजवळ काटोल बायपास रोड

हनुमाननगर झोन
सोमवारी क्वॉटर यूपीएचसी गजानन मंदिरजवळ सोमवारी क्वॉटर
मानेवाडा यूपीएचसी शाहूनगर
हुडकेश्वर यूपीएचसी नासरे सभागृहासमोर शिवाजी कॉलनी
नरसाळा यूपीएचसी नरसाळा ग्रामपंचायतीजवळ(Latest Marathi News)

धंतोली झोन
कॉटन मार्केट यूपीएचसी आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा
बाबुलखेडा यूपीएचसी पंचशील नाईट शाळेजवळ रामेश्वरी रोड
चिंचभवन यूपीएचसी दत्त मंदिर झेंडा चौकजवळ चिंच भवन वर्धा रोड

नेहरूनगर झोन
नंदनवन यूपीएचसी दर्शन कॉलनी
बिडीपेठ यूपीएचसी त्रिकोणी मैदान बिडी पेठ
ताजबाग यूपीएचसी पिली स्कूल मोठा ताजबाग
दिघोरी यूपीएचसी जिजामाता नगर
भांडेवाडी यूपीएचसी संघर्षनगर, वाठोडा

गांधीबाग झोन
महाल रोगनिदान केंद्र कोतवाली पोलिस स्टेशनजवळ
भालदारपुरा यूपीएचसी गंजीपेठ फायर स्टेशनजवळ
मोमीनपुरा यूपीएचसी एम.एल. कॅन्टीनजवळ (Latest Marathi News)

सतरंजीपुरा झोन
शांतीनगर यूपीएचसी मुदलियार चौक शांतीनगर
जागनाथ बुधवारी यूपीएचसी तबला मार्केट जागनाथ बुधवारी
मेंहदीबाग यूपीएचसी मेंहदीबाग
कुंदनलाल गुप्तानगर यूपीएचसी एनआयटी ग्राउंड पंचवटीनगर
बिनाकी यूपीएचसी खैरीपुरा लालबाग
सतरंजीपुरा यूपीएचसी बॅडमिंटन हॉल सतरंजीपुरा

लकडगंज झोन
हिवरीनगर यूपीएचसी पॉवर हाऊस हिवरीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT