नागपूर

नागपूर : कोरोनाची लाट ओसरताच टेलर मोहल्ल्यात रौनक

टेलरिंग व्यवसायावर चालतो दोनशे परिवारांचा उदरनिर्वाह

सकाळ वृत्तसेवा

सदर : रेडिमेडच्या जमान्यात आधीच टेलरिंग व्यवसायाची शिवण उसवली आहे. त्यात कोरोनाने संकटात आणखीनच भर टाकली. मात्र हळूहळू का होईना पुन्हा व्यवसायाची गाडी रुळावर येत आहे. दिवाळीनंतर सध्याच्या लग्नसराईने सदर भागात पुन्हा रौनक आली असून, बऱ्यापैकी कमाई होऊ लागल्याने टेलर व्यावसायिक खूष आहेत.

इंग्रजांच्या काळात वसलेल्या व टेलर मोहल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या सदर, छावणी भागात कित्येक वर्षांपासून अनेक गोरगरीब परिवार दिवसरात्र मेहनत करून आपले पोट भरताहेत. फॅशन अन रेडिमेडचा जमाना आल्यापासून टेलरिंग व्यवसाय तसाही पूर्णपणे डबघाईस आलेला आहे. बोटावर मोजण्याइतके माणसे सोडल्यास आजच्या घडीला कुणीही कपडे शिवत नाहीत. तरुणाईला तर अशा कपड्यांचे जणू वावडेच आहे. ग्राहक नसल्यामुळे साहजिकच कामेही कमी झाली आहेत. केवळ लग्नसराई किंवा दिवाळीच्या काळातच या मोहल्ल्यात ग्राहकांची थोडीफार गर्दी दिसून येते.

सदर भागाचा फेरफटका मारला असता, टेलरिंग व्यवसायाची गाडी रुळावर येत असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळाले. कोरोनाच्या दोनदोन लाटा, वारंवार लागलेल्या लॉकडाउनमुळे एक-दीड वर्षे व्यवसाय ठप्प होता. अनेकांवर उपासमार व दोनवेळचे खाण्याचे वांदे होते. मात्र दुसरी लाट ओसरताच व्यवसाय गती पकडू लागला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये बऱ्यापैकी कमाई झाल्यानंतर सध्या लग्नसराईतही ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे गेल्या पाच दशकांपासून व्यवसाय करणारे छत्री समाज क्रेडिट को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश सिंगुवार यांनी सांगितले. सिंगुवार म्हणाले, टेलर मोहल्ल्यात तब्बल दोनशे परिवारांचा टेलरिंग व्यवसाय आहे. यात पुरुषांसह महिलांही मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाउनचा काळ आमच्यासाठी खूपच कठीण गेला. एका पैशाचीही कमाई झाली नाही. सारेच जण आर्थिक अडचणीत होते. जवळच्या जमापुंजीवर त्यांनी कसेबसे दिवस ढकलले. मात्र आता हळूहळू का होईना व्यवसायाची गाडी रुळावर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंब पोसू शकतो इतकी कमाई

मी गेल्या ३५ वर्षांपासून टेलरिंगचा व्यवसाय करीत आहे. कोरोनाकाळ आमच्यासाठी खूप कठीण गेला. लॉकडाउनमुळे कित्येक महिने दुकान बंद राहिले होते. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. जवळची जमापुंजी खर्च झाली. लाट ओसरल्यानंतर हळूहळू गाडी रुळावर येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी ग्राहक येत आहे. कुटुंब पोसू शकतो इतकी निश्चितच कमाई होत आहे.

-दिलीप चालखोर, टेलर

ओमिक्रॉनचे संकट मानगुटीवर

गेल्या ३०-४० वर्षांपासून या व्यवसायात आहे. पूर्वीच्या काळात लोक कपडे खरेदी करून शिवत असल्याने चांगली कमाई होत होती. मात्र रेडिमेड व फॅशनेबल कपड्यांचा जमाना आल्यापासून आमचा व्यवसाय अडचणीत आला. कोरोनाकाळात आमचे आणखीनच हाल झालेत. सर्वकाही ठीक होण्याची चिन्हे दिसत असतानाच आता ओमिक्रॉनचे संकट मानगुटीवर उभे ठाकले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनची भीती वाटू लागली आहे.

-अनिल डवरे, टेलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT