eco friendly sakal
नागपूर

Nagpur News : गाईच्या शेणापासून साकारणार श्रीगणेशाची मूर्ती

पर्यावरणस्नेही : पेंचमधील महिला बचत गटाला पाच हजार ‘श्रीं’ ची ऑर्डर

सकाळ डिजिटल टीम, राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

Nagpur News - गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी वन परिक्षेत्रातील एकसंघ नियंत्रण कक्षातील वाघोली गोमाय उत्पाद महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या गोमय मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या मदतीने महिलांना सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शासन पर्यावरणपूरक व शाडूच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन गणेशभक्तांना करीत आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक असल्याने मनपाने विक्रीवर बंदी घातली आहे. विक्री होऊ नये म्हणून शहराच्या वेशीवरच त्यांना थांबविण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक मूर्तीला मागणी वाढत आहे.

गाईच्या शेणापासून श्रीगणेशाची मूर्ती

त्यावर शेणापासून तयार केलेल्या मूर्ती उत्तम पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे, या मूर्तींचे विसर्जन राहत्या घरी, कुंडीमध्ये करता येऊ शकते. विसर्जनानंतर मूर्ती शेणखत म्हणून काम करणार आहे. अशाप्रकारे शेणापासून तयार केलेल्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

गवार गम, मैदा आणि शेणाचा वापर

मूर्ती तयार करण्यासाठी गवार गम, मैदा आणि गाईच्या शेणाचा वापर करण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती महिला बनवीत आहेत. या गणेशमूर्तींना भरपूर मागणी आहे. या मूर्तीचे वजनही कमी असल्याने आबालवृद्धांनाही सहज उचलता येऊ शकते. महिला बचत गटाला पाच हजार मूर्तीची ऑर्डर मिळालेली आहे. ४ ते १८ इंचापर्यंतचे गणपती तयार केले जात आहे. त्याची किंमत १०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. सध्या त्या पेंच प्रकल्पातील शॉपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पेंच फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. यासोबतच शेणाच्या पणत्याही तयार केल्या जात आहे. पर्यावरणपूरक असल्याने श्रीं च्या मूर्तींची मागणी वाढत आहे. पेंचने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आम्हाला रोजगार मिळाला आहे.

अंबिका खंडाते, गणेशमूर्तीकार

गोमय गणेशमूर्तीमुळे पाणी, शेती आणि निसर्गावर होणारे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतील. नागरिकांमध्येही पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनाबाबत हळूहळू जागृती होत आहे. त्यामुळे गोमय गणेशाची मागणी वाढत आहे.

— सोनल उईके, गणेशमूर्तीकार,

पेंच फाउंडेशनने गोविज्ञान अनुसंधानच्या मदतीने महिला बचत गटाला गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. लागणारा कच्चा मालही उपलब्ध करून दिला. यामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. जंगलाशेजारील नागरिकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करण्याचा हा भाग आहे. यापुढे त्यांना वाघ व इतर वन्यप्राण्यांचे साचे पुरविण्यात येणार आहे. वर्षभर गाईच्या शेणापासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री त्यांना करता येणार आहे.

— जयेश तायडे, वन परिक्षेत्र अधिकारी, पवनी (बफर)agpur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT