CPR Training 
नागपूर

CPR Training : शाळेतच मिळावे ‘सीपीआर’चे प्रशिक्षण

अटॅकनंतर लगेच उपचार मिळाल्यास रुग्ण वाचतो !

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बदलती जीवनशैली, व्यसन,तणावामुळे तारुण्यातही ह्रदयविकार बळावत आहे. कुठेही अटॅक येतो, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हृदय बंद पडलेले असते. त्यामुळे हार्ट अटॅकनंतर मृत्यू वाढत आहेत. शालेय अभ्यासक्रमातच सीपीआरच्या प्रशिक्षणाचा समावेश करावा, अशी भावना न्यू ईरा हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट्समधील प्रसिद्ध हृदयरोग विकारतज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा यांनी व्यक्त केली.

शाळा-महाविद्यालयातून प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक तत्त्वावर सीपीआरचे प्रशिक्षण दिले तर संपूर्ण देश ‘फर्स्ट एड’मध्ये सजग होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

‘सीपीआर’ म्हणजे काय?

हृदयक्रिया बंद पडल्याने कुणी कोसळल्यास ‘सीपीआर (कॉर्डिओ पल्मोनरी रिससीटेशन)’ करणे गरजेचे असते. हार्टअटॅकने रुग्णाचा रक्तप्रवाह अडखळलेला असतो आणि श्वास थांबला असतो. तेव्हा रक्तप्रवाह व ब्रिदिंग रेग्युलर करण्यासाठी एका व्यक्तीने दोन्ही हात एकावर एक ठेऊन छातीच्या दोन सापड्यांच्या मध्ये (नेकलाईनमध्ये) पोटाच्या वर लागोपाठ ३० वेळा दाबणे गरजेचे असते. बरेचदा यावेळी ‘माऊथ ब्रिथिंग’ द्यावे लागते. ‘सीपीआरमुळे रुग्णाचा जीव तर वाचू शकतो. हॉस्पिटलपर्यंत नेण्याचा वेळ मिळतो.

हार्टअटॅकची चोर पावले?

हार्टअटॅक अचानक येत नाही. तो चोर पावलांनी दस्तक देतो. त्यापूर्वी अनेक दिवसांपासून शरीर संकेत देते. छातीत दाब वाढणे, जडपणा वाटणे, गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, दैनंदिन कार्यप्रणालित थकवा जाणवणे, चार पावले चालल्याने श्वास भरून येणे, बसल्याने बरे वाटणे असे संकेत हे शरीर देते. ही लक्षणे कधी एकाचवेळी उद्भवतात तर कधी एक दिवसाआड. त्यामुळे, लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

धुम्रपान, तंबाखू, खर्रा हे हृदयावर सर्वाधिक परिणाम करणारे घटक आहेत. माझ्याकडे दरमहा येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण चाळीशीच्या आतील असतात. त्यापैकी ४० टक्के रुग्णांना स्मोकिंग, तंबाखू व खर्रा खाण्याचे व्यसन असते. हृदयविकाराने होणारे मृत्यू टाळायचे असतील, तर व्यसने सोडली तर पाहिजेच. त्या यासोबतच व्यायाम, योगसाधना, उत्तम झोप, आहारासोबतच तणावमुक्त राहिले पाहिजे. बैठे काम करणाऱ्यांनी दर तासाला जागेवरून उठून किमान तिन मिनिटे चालले पाहिजे.

- डॉ. निधीश मिश्रा, हृदयविकार तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT