नागपूर : एका मुलीची आई असलेल्या महिलेसोबत पोलिस हवालदाराने मैत्री केली. महिलेच्या एकाकीपणाचा फायदा घेत जाळ्यात ओढले. "तुझ्या मुलीचा मी सांभाळ करतो, तसेच तुझाही खर्च उचलतो. तू फक्त दुसऱ्या युवकासोबत लग्न करू नको.' असे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही वर्षांनी हवालदार दुर्लक्ष करू लागल्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली. राजेश वसंतराव मेहर (52, रा. लोधी ले-आउट, भगवाननगर) असे आरोपी पोलिस हवालदाराचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय महिला लकडगंजमधील इतवारी परिसरात राहते. तिला पहिल्या पतीकडून एक मुलगी आहे. आजारपणामुळे काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेला कोणताही आधार नसल्याचे पाहून पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस हवालदार राजेश मेहर याने तिच्याशी सलगी केली. तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. त्यामुळे दोघांत मैत्री झाली. त्याने महिलेच्या एकाकीपणाचा फायदा घेत आपल्या जाळ्यात ओढले.
जाणून घ्या - प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन्...
"तुझ्या मुलीचा मी सांभाळ करतो, तसेच तुझाही खर्च उचलतो. फक्त तू कुण्या अन्य युवकासोबत लग्न करू नको' असे आमिष मेहर याने महिलेला दाखवले. त्यामुळे महिलेने दुसरीकडे संसार थाटण्याऐवजी घरात राजेश मेहरला आश्रय दिला. सप्टेंबर 2015 पासून तो तिच्या घरी नियमित यायचा. गेले काही वर्षे त्याने महिलेच्या घरातील किराणा, खर्च, घरभाडे व मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला. मात्र, काही दिवसांपासून तो तिच्याकडे दुर्लक्ष करायला लागला.
मुलीचा सांभाळ करतो, तुझाही खर्च उचलतो, असे आमिष दाखवल्यामुळे महिलेने पोलिस हवालदारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक व मानसिक त्रस्त सहन केल्यानंतरही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
महत्त्वाची बातमी - Video : मुख्याध्यापिकेने दिली ही अमानवी शिक्षा... विद्यार्थिनींना चालणेही झाले...
दरम्यानच्या काळात कोराडी देवी मंदिरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालत लग्न करण्याचे नाटकसुद्धा केले. त्यामुळे दोघांचे पती-पत्नीप्रमाणे संबंध होते. मुलीच्या भविष्याचा विचार करता महिलेने राजेशचा शारीरिक अत्याचारही (मारहाण) सहन केला. मात्र, काही दिवसांपासून तो तिच्या घरी येत नव्हता. तसेच मुलीच्या शिक्षणाबाबतही गंभीर नव्हता. आमिष दाखवून लग्नाचे नाटक केले आणि शारीरिक व नैतिक आघात केला.
लकडगंज पोलिस ठाण्यात आलेल्या पीडितेने पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. शारीरिक शोषणही केल्याचा आरोप महिलेने केला. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत केवळ नैतिक आघात केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपी पोलिस हवालदाराला वाचविण्यासाठी "सेटिंग' केल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.