Atrosity on bjp karyakarta  esakal
नागपूर

Crime: गुन्हेशाखेचा गंगा जमुनात वस्तीमध्ये छापा, अल्पवयीन मुलीसह तिघांची सुटका

सकाळ वृत्तसेवा

Latest Nagpur News: गंगाजमूना वस्तीमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांकडून देहव्यापार अड्ड्य़ावर बुधवारी (ता.२४) सकाळी आठ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन महिलांना अटक केली. त्यांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीसह तीन पीडितांची सुटका केली.

दिपा राजू कंचन (वय ५०), निलम उर्फ गुड्डी ऊर्फ कल्लूबाई मनिष धनावत (वय ५५, दोन्ही रा. बदनापूरा, मोतीझील, ग्वालियर, मध्यप्रदेश, ह.मु गंगाजमुना वस्ती) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाला गंगा जमुना परिसरात एक दिपा नावाची महिला देहव्यापाराकरीता महिला आणि मुली उपलब्ध करून देते अशी माहिती पथकाला मिळाली.

यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे) निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर, पोलिस हवालदार सचिन बडीये, लक्ष्मण चौरे, अंमलदार अजय पौनिकर, समीर शेख, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर, लता गवई, आरती चव्हाण व पूनम शेंडे यांच्या पथकाने सापळा रचून परिसरातील लाल शाळेजवळ कारवाई करीत, दोन्ही महिलांना अटक केली. यावेळी त्या पीडितांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना जागा उपलब्ध करून देत, देहव्यापार करण्यास लावत असल्याचे आढळून आले.

पथकाने अल्पवयीन मुलीसह तीन पीडितांची सुटका केली. याशिवाय आरोपींकडून ३ मोबाइल, रोख १ हजार असा ३२ हजार २४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध लकडगंज ठाण्यात कलम १४३, ३(५) भा.न्या.सं. सहकलम ३, ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT