Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पैशाच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना नंदनवन पोलिस हद्दीत सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तुषार किशोर इंगळे (१७) रा. शिवाजीनगर, गंगाबाई घाट असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृताचे मित्र दर्शन नाईक (२०) आणि रोहित चंद्रमणी शेंडे (२२) दोन्ही रा. जयभीम चौक या दोघांना अटक केली. पैशाच्या वादातून ही घटना घडली. तुषार हा आई-वडील व दोन बहिणींसह राहत होता. त्याचे वडील किशोर इंगळे हे चालक आहेत.

तुषार मेडिकल चौकाजवळील एका ईलेक्ट्रॉनिकच्या दुकानात काम करायचा. आरोपीही त्याच दुकानात काम करतात. तुषारने देवा आणि रोहितकडून १० हजार रुपये उसणे घेतले होते. पण पैसे परत देत नव्हता.

शिवाय दुकानात काम करताना तो देवाचे ऐकतही नव्हता. त्यामुळे देवा आणि रोहित नाराज होते. सोमवारी रात्री तिघांनीही दारू पिण्याचे ठरवले. संघर्षनगर परिसरातील मैदानात तिघांनीही दारू प्यायली. नशा चढल्यावर देवा व रोहितने तुषारला पैसे मागितले. तुषारने टाळाटाळ केल्याने वाद झाला.

दगडाने ठेचून तरुणाचा खून

दोघांनीही मिळून मारहाण केल्याने तुषार जमिनीवर पडला. रोहित आणि देवाने मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.यात तुषारचा जागीच मृत्यू झाला. दोघेही पसार झाले. मंगळवारी सकाळी स्थानिकांना तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले.

त्यांनी पोलिसांना कळवले. झोन ४ चे डीसीपी विजयकांत सागर आणि नंदनवनचे ठाणेदार रवींद्र नाईकवाडे पथकासह घटनास्थळी पोहोचले. चौकशीत सोमवारी रात्री रोहित आणि देवा तुषारसोबत असल्याचे समजले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा कबूल केला.

कापड ओढताच पित्याला अश्रू अनावर

तुषार रोज रात्री ९ वाजतापर्यंत घरी पोहोचतो. मात्र, सोमवारी १०.३० वाजले तरी तो घरी परतला नाही. वडील किशोर यांनी तुषारच्या मोबाईलवर संपर्क साधला. कामानिमित्त पारडीला गेलो आहे. लवकरच घरी येतो, असे सांगून फोन ठेवला.

वडील रात्रभर त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, तो परतला नाही, त्याचा फोनही बंद झाला. वडिलांना संघर्षनगरात एका युवकाचा खून झाल्याची माहिती मिळाली. ते पत्नीसह घटनास्थळी पोहोचले. नागरिकांची चांगलीच गर्दी होती.

मृताच्या अंगावर कापड झाकला होता. त्यामुळे वडिलांना कळायला मार्ग नव्हता. मृतक माझा मुलगा नसावा, अशी मनातल्या मनात ते प्रार्थना करीत होते. अखेर पोलिसांनी मृतकाच्या अंगावरील कापड ओढताच आई वडिलांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी त्यांचे सांत्वन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT