नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पीडिता ८ महिन्याची गर्भवती असताना त्याने लग्नास नकार दिला. अखेर पीडित ३१ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सुमित देवकुमार गौर (३१) रा. भवानीनगर, पारडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सुमित आणि पीडिता २०१५ पासून सक्करदरा परिसरातील एका मोबाईल शॉपीत काम करतात. सुमित हा विवाहित आहे. मात्र पत्नी त्याच्यासोबत राहात नाही. तर दुसरीकडे पीडितेनेही पतीला सोडले आहे. दोघांत जवळीक निर्माण झाली. सुमितने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी घरी परतली. त्यानंतरही त्याने पीडितेशी संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती झाली. तिने सुमितवर लग्नासाठी दबाव टाकला. मात्र त्याने आठ महिने टाळले, यात ८ महिने लोटले. आता पीडिता ८ महिन्यांनी गर्भवती आहे. सुमितने लग्नास स्पष्ट नकार दिला. पीडितेने घटनेची तक्रार पोलिसात केली. अटकेनंतर त्याची तुरुंगात रवानगी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.