नागपूर : कुख्यात गुन्हेगाराने पत्नीला दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या मुलाचे अपहरण केले. तो मुलासह शहरातून बाहेर नेण्याच्या तयारीत होता. या घटनेमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तातडीने चार तासांत अपहृत मुलाची सुटका केली आणि अपहरणकर्त्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. ही थरारक घटना बुधवारी उघडकीस आली. किसन बाबूलाल उईके (३६, रा. खडकपहाड, पिटेसूर) असे आरोपीचे नाव आहे. (Criminal-forcefully-abduct-a-boy)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा श्यामराव कुळमेथे (३५) या महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी किसन उईके हा काही महिन्यांपूर्वी सुरेंद्रनगर, गौड मोहल्ला येथे चंपा नावाच्या महिलेसोबत राहत होता. चंपा हिचा पती मरण पावल्यामुळे किसनने तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. किसन आणि चंपा यांच्यात कोणत्यातरी बाबींवरून वाद झाला. तेव्हापासून ते दोघेही वेगवेगळे राहत होते.
किसन तिच्यावर नजर ठेवून होता. ती घराला कुलूप लावून नातेवाइकाकडे जात होती. दरम्यान, तिने मैत्रीण चंदाचा मुलगा सुंदरम कुळमेथे याला रविनगरपर्यंत सोडून मागितले. त्याने दुचाकीने तिला रविनगरात सोडले. तेथून लगेच घरी आला. याची माहिती किसनला मिळाली. तो लगेच चंदा हिच्या घरी आला. त्याने सुंदरमला मारहाण केली. मैत्रीण चंपाला दुचाकीवर कुठे घेऊन गेला होता? असा जाब विचारायला लागला.
दुचाकीवर बसण्याची बळजबरी
सुंदरमला त्याने दुचाकीवर बसवले आणि वेगात निघून गेला. मुलाला घेऊन गेल्यामुळे चंदा घाबरली आणि तिने नागरिकांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. कुख्यात गुन्हेगाराच्या तावडीत मुलगा असल्यामुळे चंदाची रडारड सुरू झाली. दुसरीकडे किसन मुलाला शहरात अनेक ठिकाणी फिरवत होता.
लोकेशनवरून केला पाठलाग
पोलिसांनी लगेच एअरवर कॉल देत पोलिसांना अलर्ट केले. किसनच्या मोबाइल लोकेशनवरून पाठलाग करणे सुरू केले. यशोधरानगरातील कांजी हाउस चौकात किसनला सापळा रचून पकडले. न्यायालयाने त्याला एका दिवसाचा पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले.
(Criminal-forcefully-abduct-a-boy)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.