Cyber criminals are doing fraud by offering money in Nagpur  
नागपूर

तुम्हाला ‘ड्रॉ’मध्ये लागलेली कार पाहिजे की १४ लाख? उत्तर द्याल तर तासाभरात होईल होत्याचं नव्हतं

अनिल कांबळे

नागपूर ः ‘शॉपक्ल्यू ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी केल्यामुळे भाग्यवान ग्राहकांसाठी सोडत काढली आहे. त्यात तुम्हाला महागडी कार पहिले बक्षिस म्हणून मिळणार आहे. तुम्हाला कार हवी आहे की रोख १४ लाख रुपये हवेत?’ असा प्रश्‍न फोनवरून विचारला जातो. ग्राहक आनंदात लालसेपोटी रोख रकमेकडे वळतो आणि आपल्या खात्याची माहिती देतो. मात्र, तो फेक कॉल सायबर गुन्हेगाराचा असतो. तासाभरात खात्यातील रक्कम उडविल्या जाते. असे अनेक प्रकार सध्या उघडकीस येत असून सायबर क्राईममध्ये बरेच गुन्हे दाखल झाले आहेत.

विश्‍वसनीय सूत्रानुसार, नंदनवनमध्ये राहणाऱ्या एका युवकाने ‘शॉपक्ल्यू’ या ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी केली. त्याने आपला पत्ता आणि मोबाईल क्रमांक वेबसाइटवर नोंदविला. लगेच तिसऱ्याच दिवशी त्याला एक फोन आला. त्याने ‘शॉपक्ल्यू’ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना कंपनीकडून लकी कस्टमरसाठी ठेवलेल्या ड्रॉमध्ये १४ लाख रुपयांची कार गिफ्ट लागल्याचे सांगितले. त्या युवकाच्या आनंदाला पारावार नव्हता. त्यानंतर त्याने नवी कोरी कार हवी की १४ लाख रुपये कॅश हवे, अशी ऑफर दिली. 

कार मिळण्यासाठी अगोदर, टॅक्स, रजिस्ट्रेशन फी आणि आरटीओचे शुल्क म्हणून काही रक्कम भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे साहजिकच युवकाने थेट रक्कम हवी असल्याचे सांगितले. तक्रारदार युवकाला त्यांनी पैसे मिळविण्यासाठी आधी नाव रजिस्ट्रर करण्याची प्रक्रिया सांगितली. त्यासाठी बॅंकेचे डिटेल्स मागितले. युवकाने खात्यात १४ लाख येणार असल्यामुळे सर्व डिटेल्स दिले. तासाभरात त्या युवकाच्या खात्यात असलेली सर्व रक्कम लंपास केली. युवकाच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे मॅसेज यायला लागले. त्याने बॅंकेशी संपर्क साधला परंतु तोपर्यंत खाते रिकामे झाले होते.

वॉट्सॲपवर पाठवितात फोटो

कार गिफ्ट लागल्याचे सांगितल्यानंतर लगेच नव्या कोऱ्या कारचे फोटो ग्राहकाच्या वॉट्सॲपवर पाठविल्या जातात. एकदम कोरी कार बघून खरेच कार मिळणार असल्याची खात्री पटते. आठ दिवसांच्या आत कार मिळेल, असे आमिषही दाखविण्यात येते. मात्र, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली गुगल पे, पेटीएम आणि फोन पेमधून बरीच रक्कम भरण्यास सांगतात.

फोन नॉट रिचेबल

एकदा का ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास केले की सायबर गुन्हेगाराची टोळी सीमकार्ड फेकून देतात. दुसरीकडे फसगत झालेला ग्राहक त्या क्रमांकावर वारंवार फोन करतो. परंतु तो क्रमांक नॉट रिचेबल दाखवतो. तसेच कोणतीही माहिती आणि पुरावा सायबर गुन्हेगार मागे सोडत नाही.

लॉटरी, गिफ्ट, लकी ड्रॉ आणि कुपन या भानगडीत कुणीही पडू नये. कारण सायबर गुन्हेगार जाळ्यात अडकविण्याचे नवनवीन फंडे वापरत असतात. न काढलेली लॉटरी लागणार कशी याचा विचार करावा. कुणालाही आपली बॅंक डिटेल्स देऊ नये. अनवधानाने फसवणूक झाल्यास सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवावी.
- केशव वाघ, 
सहायक पोलिस निरीक्षक, (सायबर क्राईम)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT