Rash Driving sakal
नागपूर

Rash Driving : रॅश ड्रायव्हिंगमुळे रोज घडतात चार अपघात! साडेचार महिन्यांत ८८ जणांचा मृत्यू

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रॅश ड्रायव्हिंगमुळे तिघांना उडवित, गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रॅश ड्रायव्हिंगमुळे तिघांना उडवित, गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली. मात्र, दररोज शहरात वाहनांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे चार अपघात होत असून २४ मेपर्यंत जवळपास २७३ गुन्ह्यांची नोंद करीत, दंड आकारण्यात आला आहे. गेल्या साडेचार महिन्यांत ८८ जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

पुण्यातील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात अल्पवयीन कार चालकाने दोघांना उडविण्याची घटना समोर आली. त्यापूर्वी नागपुरात रामझुल्यावर दोन मद्यधुंद महिलांनी दोन युवकांना धडक देत, पसार झाल्या होत्या. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.

त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता.२४) महाल परिसरातील झेंडा चौकातही मद्यधुंद तरुणाने कारने तिघांना उडवून जखमी केले. रात्रीच्या सुमारास पॉश वस्‍त्यांसह इतर रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग करणारे मृत्यू घेऊन फिरताना दिसून येतात. बड्या कारसह बाईकवरून तरुण धोकादायक पद्धतीने वाहने चालविताना दिसतात.

गेल्या काही दिवसात या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा वाहतूक विभागाने रॅश ड्रायव्हिंगच्या विरोधात मोहीमही सुरू केली. मात्र, त्यानंतरही सातत्याने अशा प्रकारात वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी २०२३ मध्ये रॅश ड्रायव्हिंगची २१ हजार ८५ प्रकरणे समोर आली होती. त्यातून सव्वा चार कोटीचा दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत २७३ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

अनेकांची आयुष्यावर परिणाम

शहरातील रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातात एकीकडे ८८ जणांचे जीव गेले असून त्यातून शेकडोंना गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्यावर गंभीर परिणामही झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाल्याची उदाहरणे आहेत.

अशा आहेत घटना

  • २२ मे रोजी अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगरात एका वाहनचालकाने ८२ वर्षीय वृद्धाला धडक दिली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला.

  • २५ मे रोजी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारने दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

‘हिट ॲण्ड रन’ रोखण्यासाठी पोलिस ‘ॲक्शन’मोडवर

पुण्यातील ‘हिट ॲण्ड रन’नंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येऊन, रात्रीची गस्त वाढवित चौका-चौकात तपासणी मोहिमेस सुरुवात केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी रामदासपेठ, सिव्हिल लाईन, सदर आणि इतर चौकांमध्ये बंदोबस्त लावून वाहनांची तपासणी सुरू केल्याचे निदर्शनास आले.

विकेंडच्या दिवशी पार्टी मुडमध्ये शहरातील नागरिक असल्याने हॉटेल, पब आणि बारमध्ये गर्दी असते. त्यामुळे शनिवारपासून शहरातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यांवर बंदोबस्त लावून तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यातून शनिवारी जवळपास चार हजारावर वाहनांची तपासणी केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT