नागपूर : शहरात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला असून यावर्षी ५ हजार पोलिसांसह राज्य राखीव दलाचा चार कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीक्षाभूमी परसिरात एक कंपनी तैनात केली असून दीड हजारावर पोलिसांचा समावेश आहे.
दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी रावणदहण कार्यक्रम होतात. विशेष म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनाला लाखो अनुयायी देशविदेशातून येतात.
शहरात अभूतपूर्व बंदोबस्त
त्यामुळे दीक्षाभूमी आणि ड्रगन पॅलेस परिसरातही मोठी गर्दी होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम मर्यादित झाले. या परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामी लावली आहे. त्यातूनच शहरातील बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या बोलावल्या आहेत. याशिवाय वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
२९ ठिकाणी रावणच्या प्रतिकृतीचे दहण
शहरात २९ ठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीच्या दहन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. याशिवाय सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम, पथसंचलन, ३३ विसर्जन, कोरोडी, भवानी माता आणि आग्याराम देवी मंदीर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गर्दी नियंत्रणासाठी तीन स्तरावर नियोजन
दोन वर्षांनंतर दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उसळणार असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी तीन स्तरीय यंत्रणा तयार केली आहे. त्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या चारही कोपऱ्यावर थांबे देण्यात आले असून आतील गर्दी कमी होतपर्यंत बाहेरून येणाऱ्या गर्दीला रोखून ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे येणाऱ्यांपेक्षा निघणाऱ्यांची संख्या कशी वाढेल यावर पोलिसांचा अधिक भर आहे.
रेल्वे स्थानकावर आरपीएफ, जीआरपीचे ३५० जवान तैनात
धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येणाऱ्या अनुयायांसाठी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आणि अजनी स्थानकावर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. दोन्ही मिळून जवळपास ३५० जवान तैनात राहणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. अजनी स्थानकावर २३ गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
दीक्षाभूमीसाठी दीड हजारावर पोलिस
दीक्षाभूमी परिसरात आदल्या दिवशी सकाळपासून गर्दी होते. ठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. त्यात एक राज्य राखीव दलाची कंपनी यासह दोन उपायुक्त दर्जाचे अधिकारी, सात सहायक पोलिस आयुक्त, २४ पोलिस निरीक्षक, ८५ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, १,१०५ पोलिस कर्मचारी, २०० होमगार्ड, राज्य राखीव दलाचे ४० जवान तैनात राहणार आहे. याशिवाय दीक्षाभूमी परिसरात १०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.