Dating Scam delhi girls gang targeting boys Hotel pubs bill scam through dating Nagpur marathi crime news  
नागपूर

Nagpur Crime News : हॉटेल, पबमध्ये नेऊन करतात हजारोंच बील... दिल्लीतील तरुणींची टोळी 'असा' लावतेय तरुणांना चुना

Nagpur Dating AAP Scam Latest News : हॉटेल आणि पब मालकांची युवतींसोबत साठगाठ असल्याने त्यांच्याकडून ग्राहक आणल्यावर अधिकचे बील केल्यास युवतींना मोठे कमीशन दिले जाते.

मंगेश गोमासे

नागपूर : डेटींग ॲपद्वारे तरूणांना हेरून त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जात हजारोंचे बील करवून घेत, त्यातून कमिशन मिळविणारी दिल्लीतील तरूणींची टोळी नागपुरात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून तरूणांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात येत आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी महिलांना आठवडी बाजारात भुलथापा देत त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या महिला आणि पुरुषांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सिव्हील लाईन्स परिसरात पाच ते दहा तरूणी डेटींग ॲपच्या माध्यमातून युवकांना भेटायला बोलावितात.

त्यानंतर पार्टीच्या नावाने त्यांना ठराविक महागड्या हॉटेल आणि पबमध्ये नेतात. मौजमजा करीत अधिकचे बील करवून घेतात. हॉटेल आणि पब मालकांकडून ते बील जबरदस्तीने वसूल करण्यात येते.

यामध्ये हॉटेल आणि पब मालकही सहभागी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सिव्हील लाईन्स येथील पॉश परिसरात आपली वाहने पार्क करीत, त्या युवकांना ठराविक पबमध्ये घेऊन जातात. यावेळी पबमध्ये ४० ते ५० हजाराचे बील करण्यात येते. साधारणतः साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार घडत असल्याचीही माहिती आहे.

पब हॉटेलकडून टक्केवारी

हॉटेल आणि पब मालकांची युवतींसोबत साठगाठ असल्याने त्यांच्याकडून ग्राहक आणल्यावर अधिकचे बील केल्यास युवतींना मोठे कमीशन दिले जाते. त्यामुळे ठराविक पब न हॉटेलमध्येच या तरूणी जात असल्याची माहिती आहे.

तक्रारीवर केवळ सेटलमेंट

तरूणींकडून युवकांची आर्थिक लुट होत असल्याने एका युवकाने यापूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी पब चालकासोबत सेटलमेंट करण्यात आले. त्यामुळे युवकही आता आर्थिक फसवणूक झाल्यावर समोर येत नसल्याचे दिसून येते.

आलीशान गाड्यांच्या मालकीन

तरूणींकडे दिल्लीच्या क्रमांकाची दोन ते तीन आलीशान वाहने असून दररोज त्या सिव्हील लाईन्स परिसरात कार पार्क करीत, युवकांसोबत फिरायला जातात. रात्री परतून पुन्हा या वाहनाने त्या आपापल्या ठिकाणी जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे सोन्याचे भाव कोसळणार; किती घसरण होणार?

BAN vs AFG: ९ धावा ७ विकेट्स! १८ वर्षीय गोलंदाज Allah Ghazanfar समोर बांगलादेशने टेकले गुडघे, Video

6-6-6 Walking Rule: नियमितपणे चालण्याचे आहेत अगणित फायदे, फॉलो करा हा नियम

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ

पुन्हा एकदा अक्षय, गोविंदा आणि परेश रावल हे त्रिकुट एकत्र ? भागम भाग 2 ची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT