Daughter in law killed Mother in Law In Nagpur Esakal
नागपूर

Nagpur Crime: "मामा मागच्या दाराने आले अन्..." सासू ठेवत होती पाळत म्हणून सुनेने दिली खुनाची सुपारी, चिमुकलीनं सांगितलं आजीसोबत काय घडलं?

Nagpur Crime News: मृताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसे काय निधन झाले, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

सकाळ वृत्तसेवा

साथीदारांच्या मदतीने सासूचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव केला. दुसऱ्या दिवशी सासूचे अंत्यसंस्कारही आटोपले. मात्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या संशयाने प्रकरणाचा उलगडा झाला. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता संपत्तीसाठी सुनेनेच दोन चुलत भावंडांना घेऊन सासूचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले.

तब्बल १२ दिवसांनी या प्रकरणाचा छडा लागला. वैशाली अखिलेश राऊत (३२), रा. मित्रनगर अजनी, श्रीकांत ऊर्फ समीर नरेंद्र हिवसे (२५) आणि रितेश प्रकाश हिवसे (२७) (दोघेही रा. भांडार गोंडी, जि. पांढुर्णा, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

मृत सुनीता यांच्या पतीचे निधन झाले आहे. मुलगा अखिलेशचेही गतवर्षी निधन झाले. त्याची पत्नी वैशाली हिला पाच वर्षांची मुलगी आहे. सासू, सून आणि नात असे तिघे एकत्र राहायचे.

संपत्तीच्या होत्या दावेदार ■ॉ

पती आणि मुलगा गेल्यापासून सुनीता एकट्या पडल्या होत्या. वैशालीचा पाय घसरू नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवत होती. मात्र, तिला मोकळेपणा हवा होता. सासू तिच्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळे वैशालीने सासूच्या खुनाचा कट रचला. सासूचा खून केल्यानंतर संपत्तीवर कुणी दावेदार राहणार नाही, या उद्देशाने तिने चुलत भावांना दोन लाखात सुपारी दिली.

असा केला गेम

२८ ऑगस्टला ठरल्याप्रमाणे वैशालीने तिच्या साथीदारांना आधीच बोलावून घेतले. घरात सासू, वैशाली आणि मुलगी असे तिघे होते. सर्वांनी जेवण केले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वैशालीने मागचे दार उघडले. दोन साथीदार घरात आले. वैशाली सुनीता यांच्या छातीवर बसली तर दोघांनी तिचा गळा आवळला

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव

सकाळी सासू सुनीता यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी वैशालीने तिचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांना दिली. अंत्यसंस्काराची तयारी झाली. घाटावर अंत्यसंस्कारही झाले. मृताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसे काय निधन झाले, असा प्रश्न पडला. वैशालीचा मोबाईल तपासला असता त्यात दोन युवकांशी संवाद झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली.

दोन मामा मागच्या दाराने आले

पाच वर्षांच्या चिमुकलीने पोलिसांना सांगितले की, मध्यरात्री दोन मामा मागच्या दाराने आले. त्यांनीच आजीचा खून केला. यावरून पोलिसांनी वैशालीची चौकशी करून रहस्य उलगडले. ही कारवाई पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सुशांत उपाध्ये, पंकज बावणे, स्वाती माळी, नितीन सोमकुंवर, अश्विनी सहारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT