नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना मृतांचा आकडाही वाढत आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिकाही कमी पडत आहेत. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहचविण्यासाठी महापालिकेने आपली बसचा उपयोग शववाहिका म्हणून सुरू केला आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय चिंताजनक बनली आहे, दर दिवसाला मृत्यूचा टक्का वाढत आहे. कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. मृत्यू कमी असल्याने सामाजिक उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांच्या शववाहिकेतून कोरोनाबाधितांचे शव अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहोचवण्यात येत होते. मात्र, मृत्यू वाढल्यामुळे या शववाहिकांची अल्प संख्या लक्षात घेत महापालिकेने आता आपली बसला रुग्णवाहिका बनवले असून शहरात सुमारे ४ बसेसमध्ये एकाच वेळी चार ते पाच कोरोनाबाधित शव अंत्यसंस्कारासाठी घाटावर पोहोचवण्यात येत आहेत.
शवाची उचल करण्यासाठी पाच जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. मेडिकल आणि मेयोतील शवागारातून आपली बसमधून सकाळी ११ वाजता घाटावर अंत्यसंस्कारासाठी शव पोहोचवण्यास सुरुवात होते. ते रात्री ८ वाजेपर्यत सुरू असते. महापालिकेच्या ९ शववाहिका आहेत. त्यात चार आपली बस असलेल्या शववाहिकांची भर पडली आहे.
मेडिकलच्या शवागारात ७० शव -
बुधवारी पंधरा ते वीस तासांमध्ये मेडिकलच्या शवागारात सुमारे ७० पेक्षा अधिक मृतदेह गोळा झाले. यातील ७५ टक्के कोरोनाबाधित होते. मेडिकलप्रमाणेच मेयोची स्थिती आहे. मेयोतील शवविच्छेदन कक्षात दर दिवसाला सुमारे ४० पेक्षा अधिक मृतदेह गोळा होतात. यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाबाधित असल्याचे कळते.
अम्बुलन्सदेखील बनल्या शववाहिका -
कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात इतर आजारांचे रुग्ण अम्बुलन्सचालकांना मिळत नाही. यामुळे अखेर अम्बुलन्समधून रुग्ण नेण्याऐवजी आता मृतदेह पोहोचवण्यात येत आहेत. मेडिकल -मेयो परिसरातील सर्वच रुग्ण पोहोचवणारे अम्बुलन्सचालक आता शववाहिकाचालक बनले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.