Nagpur News : ‘‘जगात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढला आहे. त्यातून ‘डीपफेक’चा तयार होणारा व्हिडिओ घातक आहे. ‘डीपफेक’ चिंतेचा विषय आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे शनिवारी आयोजित १११ व्या दीक्षान्त समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
मुर्मू म्हणाल्या, ‘‘भारताला ‘ग्लोबल नॉलेज पॉवर’ म्हणून समोर आणण्यासाठी संशोधन व विकसित तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.’’ ज्ञानाचा उपयोग देशोन्नतीसाठी करण्याचे आवाहन बैस यांनी केले. यावेळी डॉ. रामचंद्र तुपकरी यांना डी.एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) आणि डॉ. राजश्री रामटेके यांना टी. व्ही. गेडाम सुवर्णपदकाने सन्मानित केले. १२९ संशोधकांना आचार्य पदवीने गौरविले.
‘व्हावे मोठे बाबूसाहेब। काम जुजबी पैसा खूब। मोठी पदवी दिखाऊ ढब। ही उच्चता म्हणोची नये।’ या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ओळींचा उल्लेख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला. उच्च पदवी, चांगली नोकरी, उच्च पद, कमी मेहनत आणि जास्त पगार आणि दिखावा ही श्रेष्ठत्वाची लक्षणे नाहीत, असे सांगून त्यांनी अर्थविवेचन केले.
विद्यापीठाने ज्ञानाचा उपयोग समस्या सोडविण्यासाठी करावा. ज्ञानातूनच तुमची, समाजाची आणि देशाची ओळख होईल. त्या ज्ञानाला संपत्ती, तंत्रज्ञानात परावर्तित करून प्रगती साधावी.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
विद्यापीठाने शंभरी गाठली आहे. त्यामुळे आव्हानांना पेलण्यासाठी सज्ज राहावे. मिळालेल्या शंभर कोटींतून विद्यापीठाने विकासात्मक कामे करावीत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.