Devendra Fadnavis e sakal
नागपूर

'महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती, पण मोदी लावणार नाहीत'

भाग्यश्री राऊत

नागपूर : महाराष्ट्रातील खरंच आणीबाणी परिस्थिती आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांना सोबत घेऊन काम करतात. त्यामुळे महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती असली तरी पंतप्रधान मोदी आणीबाणी लावणार नाहीत. मात्र, राज्य सरकारने राजकारण बंद करून केंद्राला सहकार्य करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आशिष देशमुखांनी राज्यात आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी लावण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी केली. त्यावरच फडणवीस बोलत होते.

'आशिष देशमुखांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याने हल्लाबोल करतात'

फक्त राज्यात नाहीतर संपूर्ण देशात काय चालले आहे, हे देशमुखांनी पाहावे. त्यांची नाराजी पक्षावर आहे, की सरकावर आहे हे समजत नाही. त्यांना पक्षामध्ये कोणतेही स्थान नसल्याने आशिष देशमुख असा हल्लाबोल करतात, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या कारवाई करावी किंवा त्यांना पक्षात कोणतेही स्थान द्यावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले आशिष देशमुख -

मागील एक वर्षात शासनाकडे वेळ होता. त्यांना राज्यातील प्रत्येक शहरामध्ये जम्बो हॉस्पीटल उभे करता आले असते. मला वाटते राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. संविधानातील कलमानुसार आपण आणीबाणी लागू करू शकतो. आरोग्य आणि आर्थिक संदर्भातील ही आणीबाणी केंद्र सरकारने महाराष्ट्रात लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

दोन महिन्यासाठी ही आणीबाणी असेल. त्यानुसार लोकांचे जीव वाचविता येतील. लता मंगेशकर हॉस्पीटल माध्यमातून मागील वर्षी जवळपास तीन ते साडेतीन हजार रुग्ण आम्ही वाचवू शकलो. आज परिस्थिती अशी आहे, की ज्यांची ओळख आहे त्यांचेच जीव वाचत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचेच जीव वाचतात. आता ग्रामीण भागात कोरोना शिरलाय. मात्र, राज्याकडून त्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत, असाही आरोप आशिष देशमुख यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT