नागपूर - उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिका आयुक्त तसेच नागपूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीची माहिती घेतली.
विशेषत: शेतीच्या स्थितीची आणि पेरण्या इत्यादींची माहिती घेतली. जेथे शेतीचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
नागपूर शहरात 149.3 मि.मी., नागपूर ग्रामीणमध्ये 139.4 मि.मी., कामठीत 103.8 मि.मी., हिंगण्यात 192.9 मि.मी., उमरेडमध्ये 115 मि.मी., कुहीत 94.7 मि.मी. पाऊस झाला आहे. एसडीआरएफ, आपदा मित्र, महापालिका अग्निशमन दलाच्या मदतीने विविध भागातून 25 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सुमारे 200 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.